व्यसनाच्या भस्मासुराने समाजातील प्रगती भस्मसात केली – दिलीप भोयर,तरोडा येथे निराधार लाभार्थीना दिली व्यसनमुक्तीची शपथ

वणी :- स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात ग्रामीण भागातील जणतेंनी आपल्या हक्क अधिकाराची लढाई न लढता अज्ञानतेने गुरफडलेल्या व्यसनाच्या भस्मासुरात अडकून समाजाचेच प्रगती भस्मसात केली आहे. त्यामुळे समाजातून व्यसन हद्दपार करण्याची गरज निर्माण झाली आहे. असे मत श्रीगुरुदेव सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडीचे तालुकाअध्यक्ष दिलीप भोयर यांनी तरोडा येथिल ग्राम पंचायत कार्यालयात ता. १७ रोजी आयोजित निराधार मार्गदर्शन व व्यसनमुक्ती शिबिरात व्यक्त केले.
श्रीगुरुदेव सेना व वंचित बहुजन आघाडी आणि निर्मिती बहुद्देशीय संस्थेच्या संयुक्त विधमाने वंचित निराधार लोककल्याण अभियान अंतर्गत ग्रामजयंती पर्वा निमित्य तरोडा येथे निराधार मार्गदर्शन व व्यसनमुक्ती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शक म्हणून दिलीप भोयर तर प्रमुख अतिथी म्हणून वंचितचे जिल्हाउपाध्यक्ष मंगल तेलंग, सुभाष परचाके, ग्राम पंचायतीच्या सारपंच्या सौ. वैष्णवी वराटे, ग्रा. पं. सदस्य स्मिता गोवारदीपे , प्रविण बावणे, निता दहाट व प्रतिमा मडावी आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी १० निराधार लाभार्थ्यांची निवड करण्यात आली असून त्यांना व्यसनमुक्तीची शपथ देऊन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिखित राष्ट्रवंदनेने ग्राम पंचायतीचे कामकाज सुरू करावे यासाठी सारपंच्या वैष्णवी वराटे यांना देण्यात आले व राष्ट्रावंदना घेऊन शिबिराची सांगता करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सतीश वराटे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.