
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
दिनांक 12 डिसेंबर 2019 रोजी मुकुटबन येथे शिक्षक संघ र.जी. 235 चे भव्य शिक्षक मेळावा व सत्कार समारंभ कोरोना प्रतिबंधक नियमाचे पालन करून साजरा करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून वणी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार श्री संजीवरेड्डी बोदकुरवार साहेब तर अध्यक्ष म्हणून शिक्षक संघ 235 चे जिल्हाध्यक्ष श्री राजूदास जाधव सर होते. प्रमुख अतिथी मध्ये राजूभाऊ गोंड्रावार सभापती पंचायत समिती झरी सौ. लताताई आत्राम उपसभापती झरी,सौ. प्रणिताताई घुगुल ,विनोदराव गोडे, सुरेशभाऊ मानकर, दिनकरजी पावडे, प्रवीण राणे आसाराम चव्हाण राजेंद्र पिंपळशेंडे, शरद इंगळे, शशिकांत खडसे सौ.सुरेखा आगुलवार इत्यादींची उपस्थिती होती.
कार्यक्रमात शिक्षकरत्न, सेवाव्रती श्री राजूदास जाधव सर आणि श्री संजीवरेड्डी बोदकुरवार साहेब यांचा सत्कार करण्यात आला.तसेच सेवानिवृत्त शिक्षकांना निरोप देण्यात आला. जिल्हा आदर्श शिक्षकांचा सत्कार, तालुक्यातील कोरणा काळातही ऑनलाइन -ऑफलाइन पद्धतीने शिक्षण देणाऱ्या उपक्रमशील शिक्षकांचा सत्कार, महाराष्ट्राचा दमदार वक्ता म्हणून विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे आकर्षण म्हणजे माननीय जाधव सर आणि शिक्षक हित जोपासणारी संघटना म्हणून प्रसिद्ध असणारी 235 संघटनेवर विश्वास ठेवत तालुक्यातील 22 शिक्षकांनी या संघटनेत आज प्रवेश केला.
या कार्यक्रमात श्री चित्तरंजन कडू उपाध्यक्ष 235 यवतमाळ श्री संजय आगुलवार अध्यक्ष झरी श्री बालाजी मुददमवार सचिव . गणेश बुट्टे, विठ्ठल उईके ,नानू मेश्राम, विठ्ठल गोपतवार, कवडु सिडाम आणि इतर शिक्षक सभासद तसेच महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
