आर्थिक परिस्तिथी कमजोर, उपचाराअभावी मुकुटंबन येथील रुग्ण:- माहिती कळताच धावून गेला रुग्णसेवक मंगेश पाचभाई

  • Post author:
  • Post category:वणी

प्रतिनिधी:नितेश ताजने,वणी

अखेर त्याच्या पायावर झाले चंद्रपुरात उपचार
घरात अठराविश्व दारिद्र, आर्थिक परिस्थिती कमजोर असा झरी जामनी तालुक्यातील मुकुटंबन या गावात धक्कादायक घटना घडली असून रुग्ण पोशेट्टी कोडरावार अनेक दिवसांपासून त्याच्या पायावर जखम झाली असता ती जखम घरी आर्थिक चणचण असल्या उपचारा अभावी समोर वाढतच गेली ही जखम पायच्या बोटापासून सुरू होऊन उपचारा अभावी गुडघ्या परेत जाऊन पोहचली
ही जखमी पायाची बातमी रुग्णसेवक मंगेश पाचभाई याना लागली असता त्यांनी मुकुटंबन गाठून त्या रुग्णाला आपल्या गाडीत मुकुटंबन वर्ण चंद्रपूर येते स्वतः घेऊन जाऊन पूर्ण उपचार केले आणि त्याच्या पायाची जखम बरी करण्या करता आर्थिक मदत करून त्या रुग्णाची माणुसकी या नात्याने त्यांनी त्यांना सहकार्य केले