दहेगाव येथील बेपत्ता ईसमाचा मृतदेह घोन्सा शिवारात

वणी : नितेश ताजणे

तालुक्यातील दहेगांव येथिल एका बेपत्ता ईसमाचा घोन्सा शिवारात मृतदेह आढळून आला आहे.
बंडु नामदेव श्रीरसागर (४७)रा.दहेगाव(घोंसा) असे मृतकाचे नाव आहे. बंडु हे दि.२८ मार्च पासुन घरातून बेपत्ता झाले होते. त्यांचे घरातील सर्व मंडळीनी त्यांचा पुरेपुर शोध घेतला असता ते कुठेही मिळू शकले नाही. परंतु आज दिनांक ३१ मार्च ला दुपारी ५ वाजताचे दरम्यान त्यांचा मृतदेह मौजा घोन्सा शिवारात मृत अवस्थेत आढळून आला.
त्यांचे पाठिमागे पत्नी सुवर्णा बंदु क्षिरसागर (४०), व दोन मुले स्वप्नील (२३), मंगेश (२०) असा आप्त परिवार आहे.