
वणी पोलीस स्टेशन तसेच वणी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय हे पोलीस महा. उपनिरीक्षक, अमरावती परीक्षेत्र, अमरावती यांचे अधिकार कार्य क्षेत्रामध्ये येत असल्यामुळे दि. २९/१/२०२२ रोजी पोलीस महा उप निरीक्षक, अमरावती यांचे विशेष पथकाने कार्यवाही करुन त्यामध्ये एकुण ४६ आरोपींना अटक केली. त्या धाड सत्रामध्ये सपोनी- निलेश देशमुख, पोउपनि- शारदाचरन तिवांरी, सफौ- ७२३ रामदास बावणे अमरावती, श्री पंजाबराव घनश्यामराव दंदे, अन्न सुरक्षा अधिकारी अन्न व औषध प्रशासन यवतमाळ यांनी सहभाग घेवून सदरचे घड सत्र यशस्वी केले व त्यानंतर वणी पोलीस स्टेशन अंर्तगत अप. क. नुसार ६५/२०२२,६६/२०२२,६७/२०२२,६८/२०२२,७०/२०२२,७१/२०२२, नुसार दि.२९.१२०२२रोजी तसेच दि. ३०.१.२०२२ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.व त्यानुसार आरोपींवर कारवाही करण्यात आली. व त्यानंतर दि.३.२.२०२२ रोजी मा. पोलीस अधिक्षकं, यवतमाळ यांचे मार्फत निलंबन आदेश काढण्यात आले व त्या आदेशान्वये कसुरदार म्हणुन १. सपोउपनि/१५१७ सुदर्शनं वानोळे, २. नापोशि/२०१७ अशोक टेकाडे, ३. नापोशि/२२८० पंकज उंबरकर नेमणुक पो. स्टे वणी, ४. नापोशि/१९९२ ईकबाल शेख उपविपोअ कार्यालय, वणी यांना निलंबन करण्यात आले व त्यांचेवर बेशिस्त, बेजबाबदार, भ्रष्टाचार आचरन, नैतीक अध:पतनाचे व पोलीस अंमलदार या पदास अशोभनीय गैरवर्तनाचे आरोप ठेवण्यात आले. व त्यांचे वर कार्यवाही करण्यात आली. त्याच प्रमाणे वणी पोलीस स्टेशनचे १९ कर्मचारी यांचे पगारवाढ रोखन्यात आलेली आहे. वास्तविक पाहता सदरची कारवाही ही बेकायदेशिर असल्यामुळे सदरचे निवेदन हे खालील मुद्द्यावर आपणास देण्यात येत आहे:
अ. सदरची कारवाही ही अत्यंत बेजबाबदार पद्धतीने केलेली असुन एकाला मायेचा व एकाला बापाचा अशी वागणूक देण्यात आलेली आहे. वास्तविक पाहता वणी उप विभागांमध्ये अवैध धंदयावर आळा व त्याचा संपूर्ण बंदोबस्त करण्याची संपूर्ण जबाबदारी ही पोलीस निरीक्षक पो. स्टे, वणी यांची तसेच पोलीस उपविभागीय अधिकारी यांची आहे, परंतु मा. पोलीस अधिक्षक साहेब यवतमाळ यांनी दि.३.२.२०२२ रोजी निलंबन आदेश पारीत करुन फक्त कर्मचारी यांनी निलंबित केलेले आहे. व सदरच्या निलंबन आदेशान्वये कर्मचारी यांचे वर बडगा काढुन अधिकारी यांना वाचवण्यात आलेले आहे.
ब. सदरच्या प्रकरणातील निलंबित नापोशि/२२८० पंकज अंबरकर यांचा पाय हा फॅक्चर असल्यामुळे मागील २ महीन्यापासुन ते आपल्या सेवेत कार्यरत नाही व ते रजेवर आहे तरी सुद्धा आहे. त्यांचेवर सुद्धा निलंबनाचा आदेश पारीत करण्यात आलेला आहे. ही शोकांतीका.
वणी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक मा.श्याम सोनटक्के हे वणी पोलीस स्टेशनचा कार्यभार सांभाळण्यापूर्वी ते यवतमाळ जिल्हा वाहतुक शाखेचे प्रमुख होते व त्यांनी उत्तम रीत्या वसुलीचा कार्यभार हा पोलीस अधिक्षकासाठी केला त्यामुळे त्यांना यवतमाळ जिल्ह्यातील महत्वपुर्ण ठाणे वणी पोलीस स्टेशन हे देण्यात आले व ते पोलीस अधिक्षक यांचे जात भाई तसेच नातेवाईक आहे व ते त्यांचे निर्देशानुसार वणी पो. स्टे. चा कारभार करतात. व ते पोलीस अधिक्षकासाठी वसुली चे काम करतात.ड. वणी मध्ये झालेली कार्यवाही ही हेतुपरस्सर झालेली असुन वास्तविक पाहता सदरच्या कार्यवाहीचा प्रथमता बडगा हा अधिकारी म्हणुन पोलीस निरीक्षक श्याम सोनटक्के यांचे वर व्हावयास पाहीजे होता, परंतु मा.पोलीस अधिक्षक यवतमाळ यांचे मर्जीतले व ते त्यांचे नातेवाईंक असल्यामुळे मा. पोलीस अधिक्षक साहेब यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे व दि. ३.२.२०२२ रोजी चा निलंबनाचा आदेश काढून कर्मचारी यांचेवर कार्यवाही करण्यात आलेली आहे. व ते चुकीची आहे. वास्तविक पाहता वणी परीसरात संपुर्ण अवैध धंदे हे पोलीस निरीक्षक श्याम सोनटेक्के यांचे आर्शिवादाने चालु आहे.
वणीतील पोलीस निरीक्षक श्याम सोनटक्के हे वणीचे आमदार मा. संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे अत्यंत निकटवर्तीय असुन ते बि.जे.पी. चे कार्यकर्ते आहेत असेच वणी परीसरात आव आणतात व त्यांचे कार्यकर्ते यांना प्राथमिक मान्यता देतात व ईतर राजकीय सर्व पक्षांना दुय्यम स्वरुपाची वागणुक देतात.
वणीतील मा. आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांचे आदेशानुसार राजकीय लोकांवर खोटे गुन्हे दाखल करुन वर्णी येथिल कॉंग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष मा. ईजहार शेख यांचेवर हेतुपुरस्सर कार्यवाही करून जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न पोलीस निरीक्षक करीत आहे.
मा. पोलीस अधिक्षक साहेब यांनी दि.३.२.२०२२ रोजी पारीत केलेला निलंबनाचा आदेश रद्ध करुन वणी पोलीस स्टे. चे कर्मचारी १ सपोउपनि/ १५१७ सुदर्शनं वानोळे, २. नापोशि/२०१७ अशोक टेकाडे, ३. नापोशि/२२८० पंकज उंबरकर नेमणुक पो. स्टे. वणी , ४. नापोशि/१९९२ ईकबाल शेख उपविपोअ कार्यालय, वणी यांना सेवेवर पूर्णनियुक्त करण्यात यावे व १९ कर्मचारी यांचे रोखलेले पगारवाढ चा आदेश रद्द करण्यात यावा. व वणी पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्याम सोनटक्के जे जिल्हा पोलसअधिक्षकासाठी वसुलीचे कामे करतात त्यांना त्वरीत निलंबित करुन त्यांची वणी पोलीस स्टेशन हद्दी बाहेर बदली करण्यात यावी तसेच त्यांचे वर सक्षम अधिका-यामार्फत यांची चौकशी अंती पुढील कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्वप्नील दुवै यांनी केली.
