स्मशान भुमि सतिघाट मध्ये दोन गटात हानामारी, अंत्यविधीतील काही लोकं गंभीर जखमी झाल्याची माहिती

प्रतिनिधी:नितेश ताजने,वणी

शहरातील स्मशान भुमि (सतिघाट)येथे अंत्यविधीला आलेल्या आणी परिसरातील काही युवकांत तुफान हाणामारी झाली असुन यामध्ये काही लोकं गंभिर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
शहरातील रंगनाथ नगर परिसरामध्ये एका २५ ते २६ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता, त्या मृत्युदेहावर आज धुलीवंदनाच्या दिवशी येथिल ‘सतीघाट’ स्मशानभुमि येथे अंतिम संस्कार करण्याकरीता दुपा २ वाजताचे सुमारास मृतकाचे नातेवाईकांसह परिसरातील काही लोकं आले होते. या दरम्यान तेथे उपस्थित असलेल्यांमध्ये शुल्लक कारणावरून वाद निर्माण झाला, हा वाद येवढा विकोपाला गेला की, परिसरातील काही मंडळी लाठ्या काठ्या घेऊन आले व अंतीम संस्कार करण्याकरीता आलेल्या लोकांवर हल्ला चढवला या वेळी अंतिम संस्कार करण्याकरीता आलेल्या लोकांत आणी परिसरातील काही युवकांत दगड फेक व लाठ्या काठ्यां सह तुफान हाणामारी झाली. यावेळी दोनही गटाकडील सदस्य गंभिर जखमी झाले. या घटनेची माहिती वणी पोलीसांना मिळताच पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले असुन परिस्थिती नियंत्रणात आली आहे. वृत्त लिहेपर्यंत पोलिस तपास सुरू आहे.