ओबीसीवादी चळवळी च्या वर्धापनदिनी ,वणी,यवतमाळ ओबीसीवादी चळवळ च्या वतीने वृक्षारोपण करून वर्धापन दिन साजरा

प्रतिनिधी:शुभम मिश्रा,वणी

स्व. सुप्रिया संजय कोकरे यांनी ओबीसीवादी चळवळीची 30 जुन 2010 रोजी स्थापना केली, समाजातील सर्व ओबीसी बांधव यांना एकत्र आणत ओबीसी समाजाच्या हितासाठी काम करणे हा एकमेव उद्देश साध्य करण्यासाठी ओबीसीवादी चळवळीची स्थापना करण्यात आली.ओबीसीवादी चळवळीचे राष्ट्रीय अध्यक्ष संजयजी कोकरे यांच्या जन्मदिनी वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धन करण्याचा निश्चय केला आहे.

 

विदर्भ प्रमुख मा.शरद तराळे यांच्या नेतृत्वाखाली वणी येथे श्रीराम नगर,देशपांडे ले आऊट च्या खुल्या मैदानात यवतमाळ जिल्हा वणी विभागातील ओबीसीवादी पदाधिकारी यांचे हस्ते वृक्षारोपण करून वर्धापनदिन साजरा करण्यात आला.वणी शहर अध्यक्ष,प्रफुल महातळे,सचिव,काशिनाथ पचकटे, तर संघटक हितेश कडू,वैभव राऊत,दुर्गेशवर उरकुडे,विनोद निरे,यांनी वृक्षारोपण केले.या कार्यक्रमाचे आयोजक प्रथमेश तराळे यांनी केले,,तर सहकार्य ,ओबीसीवादी चळवळ वणी समस्त पदाधिकारी यांनी केले.