
शहरात वास्तव्यास असलेली अल्पवयीन विद्यार्थिनी भद्रावती येथे शिक्षण घेत होती. कोरोना काळात शाळा बंद असल्याने ऑनलाइन शिक्षण सुरू होते. दरम्यान पीडितेच्या वडिलांचे मित्राकडे वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला पीडितेचे कुटुंब गेले होते. प्रसंगी पीडितेची ओळख वडिलांच्या मित्राचा भाऊ विक्की किशोर पटूंना २०, यांचेशी झाली. दरम्यान त्याच्यासोबत संभाषण सुद्धा सुरू झाले. ओळखीचा फायदा घेत विक्कीने पीडितेला ५ ऑगस्ट ला घरी बोलावून घेतले. आणि तिच्यावर दुपारी एक वाजताचे सुमारास अत्याचार केला. या घटनेची माहिती पीडितेने आईला सांगितली. आणि यासंबंधीची तक्रार वणी पोलिसात दिल्यावरून विक्की किशोर पटूंना विरुद्ध भा दं वि ३७६(३) सहकलम, भा दं वि ४,६ पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार शाम सोनटक्के यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक प्रवीण हिरे, सागर सिडाम करीत आहे.
