४ राज्यात भाजपाने दणदणीत विजय मिळवल्याबद्दल वणीत भाजपाकडून जल्लोष

वणी : नितेश ताजणे

देशात ५ राज्यात झालेल्या निवडणुकीत तब्बल ४ राज्यात भाजपाला घवघवीत यश मिळाले आहे. आज वणीत भाजपाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत व लाडु भरवुन हा विजय साजरा केला.
देशात ५ राज्यात झालेल्या निवडणुकीत ४ राज्यात भाजपाला घवघवीत यश मिळाले आहे.
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये भाजपला मोठं यश मिळालं आहे. पंजाब वगळता चार राज्यात भाजपाला दणदणीत यश मिळाले आहे. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मोठं यश मिळविता आलं असे यावेळी भाजपाच्या पदाधिकार्यांनी सांगितले.
यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते दिनकरराव पावडे, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे, जिल्हा महामंत्री रवी बेलुरकर, पं.स.सभापती संजय पिंपळशेंडे, तालुका अध्यक्ष गजानन विधाते, संतोष डंभारे,भाजयुमोचे जिल्हा महामंत्री नितीन वासेकर, ता. सरचिटणीस कैलास पिपराडे, शंकर बांदुरकर,जि.प.सदस्य बंडु चांदेकर, महिला आघाडीच्या संध्याताई अवताडे,आरती वांढरे,लोढे,लव्ली लाल, दिपक पाऊनकर,अवी आवारी, निलेश होले यांचेसह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.