

प्रतिनिधी:शुभम मिश्रा,वणी
‘माझी कविता, माझे विश्व ‘ या विषयाला अनुसरुन जिल्हास्तरीय बाल काव्य लेखन स्पर्धा आयोजित केली . यात सुमारे साडेचारशे बालकवींनी सहभाग घेतला. त्या बालकवींना प्रत्यक्ष आपली काव्य प्रतिभा सादरीकरण करण्याची संधी ऑनलाईन बालकवी संमेलनात देण्यात आली होती.यात वणी तालुक्यातून जि प शाळा कायर येथील वर्षा राकेश शंकावार हिने वर्ग 6ते8 गटातून प्रथम क्रमांक,
तर चंचल मनोज झोडे हिने वर्ग 1ते5या गटातून द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.
🏅🥉🥈🥉🥈🏅🥈🏅🏅
बाल कवयित्री कु चंचल मनोज झोडे हीच्या याच कवितेला द्वितीय पारीतोषिक प्राप्त झाले.👇
माझी शाळा
माझी शाळा हो सुंदर शाळा
तिचा मला खूपच लळा
शाळेतून मिळते जीवनाचा धडा
रोज पाठ करते मी पाढा
माझे बाबा करतात कष्ट
शाळेतून शिकली मी गोष्ट
शिकून व्हायचं मला मोठं
बोलू नये कधीच खोटं खोटं
कोरोणा संपू दे लवकर
शाळेत जाऊ दे भरभर
अभ्यास करीन जोरदार
शाळा आवडते फार फार
कु चंचल मनोज झोडे
वर्ग 4था
जि.प.उच्च प्राथमिक शाळा कायर पं. स वणी
मार्गदर्शन- सौ कुमुदिनी मोरेश्वर देवतळे
पदवीधर शिक्षिका
