
तालुका प्रतिनिधी, झरी:– तालुक्यातील अडेगाव येथील दोन महिला व ६ ते ७ तरुणांनी अवैधरित्या दारू विक्रीचा सपाटा लावला होता . याबाबत ग्रामवासीया तर्फे अनेक तक्रारी ऐकला मिळत होते तसेक याची माहिती ठाणेदार अजित जाध याना यांना देण्यात आली. ठाणेदार यांनी आपले पोलीस कर्मचारी यांना बजावून अडेगावतील दारू विक्रेत्यांना पकडून कार्यवाहीची आदेश दिले. पोलिसांनी गावातील महिला सविता मलवडे,निर्मला कामतवार,बंडू गोहणे,अजय काटकर, राजू भलमे, भगवान मासिरकर याना दारुसह पकडून कार्यवाही केली . तरी सुद्धा लपून अवैधदारू विक्री सुरूच होती. याबाबत सरपंच लालसरे यांनी पोलीस स्टेशन ला दिली होती. व त्वरित दारू विकणाऱ्या महिक व तरुणांना आयक करून कार्यवाहीची मागणी केली. याच अनुषंगाने पोलीस पुन्हा ऍक्टिव्ह झाली व लपून रात्री दारूच्या पेट्या घेऊन जाणाऱ्यांची फिल्डिंग लावली व मुजोर दारू विक्रेते व परवाना धारक देशी दारू दुकांदारावर वॉच सुरू झाला व दोन दिवसात चार दारू विक्रेत्यांना पकडण्यात आले.
२३ मार्चला सकाळी अडेगाव येथील भगवान मासिरकर याला पल्सर दुचसकी सह ९० मीलीच्या ८० शिष्य किंमत २१०० व दुचाकी किंमत २० हजार असा एकून २१ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. २६ मार्च रोजी सकाळी बंडू गोहणे याला ३० देशी दारूच्या ९० मीलीच्या शीश्या किंमत ,९०० रुपयेची जप्त करण्यात आले. जिनोणी येथील वामन सातपुते याच्याकडून १८ शिष्य किंमत १०८० चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
२८ मार्चला रात्री गावाच्या मध्यभागी असलेल्या देशी दारूच्या दुकानातून शंकर चौधरी याला १८० मीलीच्या २० शिष्या किंमत १२२०० चा मुदेमनाल जप्त केला तर बाबाराव गोहणे याच्याकडून २३ शिष्य किंमत १३८० रुओए असा माळ जात करून दोघांवरही गुन्हे दाखल करण्यात आले.
देशी दारूच्या बाटली किंमत २४०० रुपये घेऊन निघताच पोलिसांनी पकडले. व ठाण्यात नेऊन गुन्हे दाखल करण्यात आले. ठाणेदार अजित जाधव यांच्यासह अडेगावच्या सरपंच सीमा लालसरे सामाजिक कार्यकर्ते मंगेश पाचभाई व काही ग्रामपंचायत सदस्य व पोलीस कर्मचारी यांनी गावातील संपूर्ण अवैध दारू विक्री बंद करण्याचा निर्धार केला असून अडेगाव येथील दारू विक्री व पुरवठा करणाऱ्याची गय केल्या जाणार नाही आहे. अडेगावतील एक महिलेला मुकुटबन येथी ल तर इतर तरुणांना शिवा नामक तरुण मुकूटबन येथी लदारू दुकानातून दुचाकीने पुरवठा करीत आहे. या दोघांनाही चांगलाच धडा शिकविण्याच्या तयारीत पोलीस विभाग व ग्रामपंचायत सरपंच व सदस्य दिसत आहे. वरील कार्यवाही ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल सकवान प्रवीण तालकोकुकवार,दिलीप जाधव,संजय खांडेकर, संदीप बोरकर,संदीप कुमरे यांनी केली.
