
प्रतिनिधी:नितेश ताजने,वणी
केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात सुरू असलेला संघर्ष आता निर्णायक वळण घेत आहे. दिल्ली येथे संपन्न झालेल्या शेतकरी संघटनांच्या बैठकीत शेतकरी आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी 8 डिसेंबर रोजी भारत बंद ची हाक देण्यात आली आहे. याच आंदोलनाचा एक भाग म्हणुन वनीतील विविध राजकीय पक्ष व संघटनांच्या वतीने किसान संघर्ष मोर्चा चे नेत्रूत्वात वणी येथे बंद पाळण्याचा निर्णय स्थानिक नेत्रुत्वानी झालेल्या बैठकीत घेतला आहे. या बंदला वणी विधानसभा क्षेत्र शिवसेना संघटक व इंदिरा सहकारी सूतगिरणीचे अध्यक्ष सुनील कातकडे यांनी जाहीर पाठिंबा दर्शविला आहे.या बंदला वणी विधानसभा क्षेत्रातील शिवसैनिकांनी पाठिंबा दर्शविण्याची आवाहन शिवशसैना संघटक सुनिलभाऊ कातकडे यांनी केले आहे.
