
जो भाग अतीदुर्गम आहे आणि तिथे संपुर्ण सोयी सुविधेची वानवा आहे ना कोणते शिकवणी वर्ग ना वाचनालय ना मार्गदर्शन करणारा मार्गदर्शक तरी अतिदुर्गम आदिवासीबहुल भागातील मुलगी जेव्हा केन्द्र स्तरीत वक्तृत्व स्पर्धेत पहिली येते आणि पुन्हा तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत तिसरी येते कोणत्याही प्रकारची शिकवणी नसुन सुध्दा तालुका स्तरावर झळकते तेंव्हा त्या विद्यार्थिनीचे भरभरून कौतुक तर होणारचतर मागील काही काळापासुन कोरोना विषाणूने थैमान घातला होता तेंव्हा संपुर्ण जीवन जगण्याचा आणि शिक्षणाचा खेडखोळंबा झालेला होता परंतु मागील काही महिन्यापासुन शासनाने सर्व गोष्टीची काळजी घेऊन शाळा सुरु करण्याला मान्यता दिली आहेपरंतु कोरोना विषाणु संसर्गाच्या भितीचे वातावरण मुलांमध्ये निर्माण झालेले असल्यामुळें त्यांना हिमतीचा हात देण्यासाठी व त्यांचा कलागुंणाना वाव देण्याकरिता तालुक्यातील कर्तव्य दक्ष गटविकास अधिकारी गजानन मूंडकर यांचा संकल्पनेतून अतिशय दुर्गम व नक्षलग्रस्त असलेल्या पंचायत समिती झरीजामणी येथे नावीण्यपूर्ण उपक्रमांतर्गत पंचायत समिती झरीजामणी मधील एकूण दहा केंद्रातील 116 शाळेमधील जि.प.शाळेमधील शालेय विद्यार्थ्याकरीता केंद्रस्तरीय वक्तृत्व स्पर्धचे आयोजन करण्यात आले होते
त्यात कोरोना महामारीमुळे प्रदीर्घ कालावधीनंतर प्रत्यक्षात वर्गाध्यापनाला सुरूवात झाली शाळा शाळांमध्ये पुन्हा नव्या जोमाने किलबीलाट सुरू झाली हाच मुद्दा हेरून विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव मिळावा, विद्यार्थी वक्तृत्ववान व्हावा,त्यांच्यामध्ये सभाधिटपणा यायला पाहिजे भाषिक कौशल्य विकसित झाले पाहिजेया उदात्त हेतूने गजानन मुंडकर (गविअ झरीजामणी.) यांनी कोरोना कालावधीतील विद्यार्थ्याना मनोगत व्यक्त करण्याकरीता केंद्रस्तरावर इयत्ता 1 ते 5 व 6 ते 8 या दोन गटामध्ये “कोरोना महामारीचे मानवी जीवनावर झालेले परिणाम या विषयावर वक्तृत्त्व स्पधेचे आयोजन करून विद्यार्थ्याकरीता व्यासपीठ उपलब्ध करून दिले होतेतेंव्हा व्यासपिठावर अतिदुर्गम आदिवासी बहुलभागांतील शिबला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी कुमारी. चैतन्या संजय चांदेकर या विद्यार्थिनीने भाग घेतला होता तेंव्हा तिने हिवरा येथे झालेल्या केंद्रस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून ती केंद्रस्तरीत वक्तृत्व स्पर्धेत पहिली आली होती
त्यानंतर तिची तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत निवड करण्यात आली तेव्हा तीने झरि तालुक्यांतील मार्की येथे दिनांक २८ ऑक्टोंबर रोजी झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळवून आपल्या तालुक्यात शाळेचे नावं मोठे केले आहेतेंव्हा तालुकास्तरीय वक्तृत्त्व स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या प्रत्येक गटातील स्पर्धकाला वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजिवरेड्डी बोदकुलवार यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले आहेत्यामुळे अतीदुर्गम नक्षलग्रस्त असलेल्या सिबला गावात व परिसरात कुमारी. चैतन्या संजय चांदेकर या विद्यार्थिनीचे भरभरून कौतुक होत आहे
