महसूल कर्मचारी राळेगाव यांचा आठव्या दिवशीही संप सुरूच

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

महसूल विभाग कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी 04 एप्रिल 2022 पासून बेमुदत संप पुकारला आहे. त्यामध्ये राळेगाव महसूल कर्मचारी संपात 100% सहभागी आहेत. संपामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल संघटनेने दिलगिरी व्यक्त केली आहे. परंतु न्यायिक मागण्या बऱ्याच कालावधीपासून मान्य होत नसल्याने संपा सारखा पवित्रा घेण्याची गरज पडल्यामुळे तोडगा निघेपर्यंत बेमुदत संप सुरू आहे. महसूल कर्मचारी राळेगाव यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत आज दिनांक 11/04/2022 रोजी रोजी कळंब तालुक्यातील धोत्रा येथील माऊली वृद्धाश्रम धोत्रा येथे भेट देऊन सहकार्याची भूमिका ठेवून महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंती निमित्त राळेगाव महसूल संपकऱ्‍यांनी मदत गोळा करून वृद्धाश्रमाला अल्पशी मदत करण्यात आली. यावेळी श्री. गजानन बलांद्रे, श्री. बि.के भोरे, श्री. कल्पेश वाढीवा, श्री. प्रवीण कोल्हे, श्री. हरिष श्रीवास, श्री. अतुल शिंगारे , श्री. राजेंद्र येंडे, श्री. गजानन खोकले, श्री. संजय झाडे, श्री. विजय मडावी, श्री मुनेश्वर कुळसंगे, श्री विलास गाडे , श्री दिलीप राजूरकर व इतर कर्मचारी उपस्थित होते.