
प्रतिनिधी:नितेश ताजने,वणी
वणी:-
वणी परिसरात कोरोना विषाणूने हाहाकार माजविला आहे. सातत्याने या परिसरात रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे येथील ग्रामीण रुग्णालयातील ट्रामा केअर इमारती मध्ये आक्सिजन, वेंटीलेटर, बेड व अँम्बुलन्स सुविधा उपलब्ध करण्याकरिता 5 कोटी रुपयाचा निधी खनिज विकास निधीतून तात्काळ मंजुर करावा अशी मागणी आ. संजीवरेडडी बोदकुरवार यांनी पालक मंत्री संदिपान भूमरे व जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे केली आहे.
वणी शहर व तालुक्यामध्ये कोरोनाचा प्रचंड उद्रेक होत आहे. रुग्णांना उपचारासाठी भटकंती करावी लागत आहे. खाजगी रुग्णालयातील खर्च सर्वसामान्यांना परवडण्यासारखा नसल्याने सर्व सामान्य कुटूंबातील रुग्णांचे मोठे हाल होत आहे. ही गंभीर बाब पालकमंत्री तथा जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनात आणून वणी तालुका हा खनिज संपत्तीने नटलेला असून या खनिज निधीच्या माध्यमातुन फार मोठा निधी जिल्हा खनिज प्रतिष्ठानला प्राप्त होतो. वणी तालुका हा 100 टक्के बाधीत क्षेत्रात येत असल्याने उपलब्ध निधीतुन तातडीने पाच कोटी रुपये तातडीने मिळणे गरजेचे झाले आहे.
कोविड या आजारावर अति तातडीने नियत्रंण मिळवण्यासाठी तसेच रुग्णांचे प्राण वाचविणे ही शासन, प्रशासन व आपली प्राथमिकता आहे. येथील ग्रामिण रुग्णालयातील ट्रामा केअर इमारती मध्ये 80 खाटांचे डेलीकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरु करण्याकरिता 80 बेड, आक्सिजन, वेंटीलेटर, रेमडेसिवीर इंजेक्शन, स्ट्रेचर, तसेच आक्सिजन व वेंटीलेटर ने सज्ज 2 रुग्णवाहिका आदी महत्वपुर्ण उपकरणाकरीता तातडीने जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत 5 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करावा अशी मागणी आ. बोदकुरवार यांनी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या कडे केली आहे.
