गट ग्रामपंचायत चा भोगळ कारभार चव्हाट्यावर ग्रामस्थांचा आरोप .ग्रामस्थांकडून तक्रार दाखल, कारवाई न झाल्यास उपोषण करू

प्रतिनिधी:नितेश ताजने,वणी

.. मौजा गट ग्रामपंचायत वरुड सालेभट्टी ही ग्राम पंचायत आदिवासी बहुल क्षेत्रात मोडणारी गट ग्रामपंचायत आहे. वरुड-सालेभट्टी व वरुड-तांडा अशा वेगवेगळ्या गाववस्त्यांनी मिळून निर्माण झालेल्या या गट ग्रामपंचायतीच्या गाव विकासासाठी शासनाकडून आजपर्यंत लाखो रुपयांचा निधी आला. तो कागदोपत्री थातुरमातुर कामे दाखवुन खर्चही केल्या गेला. प्रत्यक्षात मात्र, गावविकास झालाच नाही. आणि जो काही विकास झालाय तो केवळ आणि केवळ विषयात नमुद भ्रष्ट अधिकारी आणि पदाधिकारी यांचाच आर्थिक विकास झाल्याचे दिसते आहे. याबाबत आम्ही अनेकदा आपणाकडे तोंडी वजा लेखी निवेदने दिलीत. मात्र, संबंधीतावर कुठलीच आजपर्यंत कार्यवाही झाली नाही.

१ एप्रिल २०१६-१७ ते जुलै २०२१-२२ या कालावधीत शासनाच्या

ग्रामविकासाच्या धोरणात्मक निर्णयातील वेगवेगळ्या विकासात्मक योजनांपैकी… रोजगार हमी योजनेसह आदिवासी उपाययोजना कार्यक्रम, दलितवस्ती / तांडावस्ती, पेसा योजना, १४ वित्त आयोग योजनासह ठक्करबाप्पा योजनेअंतर्गत वरुड-सालेभट्टी या गटग्रामपंचायत क्षेत्रात लाखो रुपयाची विविध कामे झालीत. यात, सिमेंट नाली बांधकाम, सिमेंट रस्ता बांधकाम, स्मशानभुमी सौंदर्यीकरण व शेड बांधकाम, सार्वजनिक व व्यक्तीगत शौचालय बांधकाम यासह पाणी पुरवठ्यासाठी बांधण्यात आलेल्या नळयोजनेचे बांधकाम देखील करण्यात आले. मात्र झालेली वरील सर्व कामे ही अत्यंत निकृष्ट दर्जाची असून धातुरमातुर स्वरुपात केल्या गेली. यापैकी तर बरीचशी कामे ही अर्धवट स्वरुपात केल्या गेली. कामाच्या निकृष्ट दर्जामुळे झालेली कामे आज रोजी कुठे आहेत हा सर्वांनाच पडलेला प्रश्न आहे. असे असतांनाही झालेल्या सर्व कामाची बिले काढल्या गेली हे मात्र विशेष. गावातील अनेक शौचालय बांधकाम निधीचे पैसे देखी काढून घेतल्या गेले व योजनांचा प्रत्यक्ष लाभ लाभार्थ्यांना मिळालाच नाही. या सर्व बेजबाबदार आणि भ्रष्ट कारभाराला ग्रामपंचायत प्रशासनासह वरीष्ठ अधिकारी, सचिव आणि ठेकेदार हे प्रत्यक्ष जबाबदार आहे.

, या सर्व भ्रष्ट कामाची चौकशी व्हावी आणि ग्रामस्थांना न्याय मिळावा म्हणून अनेकदा तोंडी बजा लेखी अर्ज विनंत्या केल्यात. मात्र भ्रष्ट लोकांना वाचविण्यासाठीचेच काम झाल्याचे आज रोजी पर्यंत तरी दिसते असे आरोप ग्रामस्थांनी केले आहे.. म्हणूनच ग्रामस्थांना न्याय ममिळावा यासाठी फकरुजी लोणसावळे रा. सालेभट्टी ग्रामवासीयाच्या पुढाकाराने ग्रामवासीयांना न्याय मिळवून देण्यासाठी व भ्रष्ट अधिकारी, ग्रामसेवक, ग्रामपंचायत प्रशासन आणि ठेकेदारावर कायदेशिर कार्यवाही व्हावी या बरोबरच अपूर्ण कामे पूर्ण करण्यात यावी. या एकमुखी मागणीसाठी दि. २३/०८/२०२१ पासून मी आपले कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणास बसणार असल्याचा उशीर दिला आहे.