वंचित बहुजन आघाडीची आक्रमक भूमिका

वणी :- येथील शिवाजी महाराज चौकात आज ता. १४ मार्च रोजी दुपारी १२.३० वा वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेत नगर परिषदेच्या प्रकाशित झालेल्या प्रभाग रचनेची होळी करून निषेध नोंदवीत फेर प्रभाग रचना करण्याची मागणी वंचित चे तालुकाध्यक्ष दिलीप भोयर यांचे नेतृत्वात आक्षेप निवेदनाव्दारे जिल्हाधिकारी यवतमाळ व मुख्याधिकारी वणी यांचेकडे करण्यात आली.
सन २०२२ मध्ये होऊ घातलेल्या नगर पंचायत निवडणुकी करिता प्रभाग रचना तयार करून यात १४ प्रभाग तयार करण्यात आले आहे. परंतु ही प्रभाग रचना शहराच्या कोणत्या नाकश्यानुसार व कायदेशीर हद्दवाढी नुसार तयार करण्यात आली आहे. याचे कोणतेही शासकीय ठोस पुरावे आपल्या कार्यालयाकडे उपलब्ध नसल्याने ही प्रभाग रचना बेकायदेशीर रित्या तयार केली आहे. त्यामुळे खालील मुद्यांवर जनतेचे समाधान व्हावे व कायदेशीर दत्तऐवजावर प्रभाग रचना तयार करण्यार यावी याकरिता खालील आक्षेपाचे निवेदन सादर करण्यात आले
यात वणी नगर परिषदेने हद्द वाढीचा ठराव विशेष सर्व साधारण सभा दि. २०/०५/२०१६ ला घेतलेल्या ठरावानुसार केवळ जैन ले आउट, काळे ले आउट व भोंगळे ले आउट हेच नगर परिषद हद्द वाढीत दर्शविले आहे, वणी गावातील गाव नंबर ३३७ मधील वरील ले आउट वगळता हद्द वाढीला पूर्व पश्चिम व उत्तर बाजूचे अंदाचे ७० सर्वे नंबर ठराव नसतांना वणी हद्दीत दि.२८/०३/२०१८ च्या अधिसूचनेनुसार आले आहेत, या व्यतिरिक्त लालगुडा येथील सर्वे नंबर ९ व ३९ वणी नगर परिषदेच्या अधिसूचनेत नसतांना हद्द वाढीचा नकाशा बनविताना ते वणी न. प. च्या हद्दीच्या आत येतात, तसेच वणी गावाचे सर्वे नंबर १३६ व १३७ स. नं. अधिसूचनेनुसार दर्शविले नाही. परंतु नकाशा काढतांना ते हद्दीच्या बाहेर येत आहे, नगर विकास विभाग मुबई परिपत्रक क्रमांक No. Gen/१०८८३/१९१९/cr-३२/८३/ud-११ नुसार लालगुडा गावचे दोन सर्वे नंबर वणी हद्दीत अधिसूचनेनुसार आल्यामुळे पूर्ण लालगुडा गावाचे सर्वे नंबर वणी न.प. हद्दीत घ्यावे लागतात. ते घेतलेले नाही. त्यामुळे सक्षम अधिकाऱ्यांच्या सहीचा नकाशा ४ वर्ष पूर्ण होवुनही बनू शकला नाही, दि. ०८/०३/२०१९ ला वणी नगर परिषदेचा वाढीव विकास आराखडा (सन १९२४ च्या हद्दीतील) डेव्हलपमेंट प्लॅन मंजूर झाला त्याचा नकाशा सक्षम अधिकाऱ्यांच्या सही निशी नगर परिषदने प्रदर्शित केला परंतु दि.२८/०३/२०१८ च्या अधिसूचनेनुसार हद्दवाढीचा नकाशा अजून पर्यंत नगर परिषद वणी सहाय्यक संचालक नगर रचना यवतमाळ ,सह संचालक नगर रचना अमरावती व संचालक नगर रचना महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडे उपलब्ध नाही. असे असतांना वणी नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक २०२२ कोणत्या हद्दवाढ नुसार होणार की सन १९२४ चा नकाशा नुसार होणार याची कायदेशीर घोषणा आपले कार्यालयाकडून करण्यात यावी व जो संभ्रम निर्माण झाला आहे तो दूर करण्यासाठी नुकतीच प्रकाशित केलेली दोषपूर्ण असलेली प्रभाग रचना रद्द करून फेर प्रभाग रचना तयार करण्यात या आक्षेपाचे निवेदन वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष दिलीप भोयर यांचे नेतृत्वात देण्यात आले. यावेळी वंचितचे जिल्हाउपाध्यक्ष मंगल तेलंग, शहराध्यक्ष किशोर मुन, अनिल खोब्रागडे, प्रा. आनंद वेले, महिला शाखेच्या शहराध्यक्षा अर्चना नगराळे, वैशाली गायकवाड कपिल मेश्राम, शंकर रामटेके राहुल मेलपल्लीवार,संकेत नगराळे, विलास दुर्गे, सचिन मडावी, सुनील पानतावणे , अनिल खोब्रागडे, अजय खोब्रागडे यांचे सह शेकडो वंचितचे कार्यकर्ते उपस्थित होते.
