महाराष्ट्र तैलिक प्रांतिक महासभेच्या युवा विभागीय उपाध्यक्ष पदावर शरद जी तराळे यांची निवड

प्रतिनिधी:शुभम मिश्रा, वणी

समाजातील एक क्रियाशील कार्यकर्ते, समाज कार्यात मोलाचे योगदान देणारे शरदजी तराळे यांची महाराष्ट्र तैलिक प्रांतिक महासभेच्या युवा विभागीय उपाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली आहे. समाजाच्या प्रत्येक कार्यात पुढाकार घेत ,समाजाच्या प्रत्येक प्रश्ननाला वाचा फोडून न्याय मिळवून देणाऱ्या या सच्चा कार्यकर्त्यांचा आज सन्मान करण्यात आला .
वणी शहरातील धडाडीचे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे.या नियुक्ती नंतर जिल्हाभरातील समाजबांधवांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे .पुढील कार्यास शुभेच्छा