विज पडून २६ बकऱ्या ठार खातेरा शिवारातील घटना


तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर


यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामनी
तालुक्यात खातेरा गावातील सचिन पांडे , विकास आगरकर बंडू जूनगरे हे तिघेही शेळीपालक मिळून बकऱ्या चारण्या करीता जगलात गेले होते . बकऱ्या चारत असतांना दुपारी ४ वाजेच्या दरम्यान दरम्यान आकाशात ढग दाढून आले पाऊस आणि विजाचा कडकडाट सुरु झाल्याने तिघांनी शेळ्याचा कळप आश्रयासाठी जंगलातिल कडू निंबाच्या झाडा खाली एकत्र गोळा केला असतांना नेमक्या त्याच झाडावर विज पडल्याने ५० नग पैकी २६ नग बकऱ्या जागीच ठार झाल्या आहे. सुदैवाने हे तिघेही शेळी पालक थोडे दुर असल्याने सुखरूप बचावले असून कोणतीही इजा झाली नाही. एकाच वेळी नैसर्गिक आपत्तीने २६ नग बकऱ्या मृत पावल्याने गरीब शेळी मालकाचे मोठा आर्थिक फटका बसला आहे . तालुक्यात चांगल्या पावसाची नितांत गरज आहे. मात्र दोन दिवसा पासून पाऊस कमी पडत असून गडगडाट जास्त अनुभवायला मिळत आहे . ऐण दुपारच्या वेळेला विजांचा कडकडाट होत असल्याने शिवारात काम करणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे .