कुर्ली येथील शिबिरात २९ लाभार्थ्यांची निवड,निराधारांना दिला व्यसणमुक्तीचा संकल्प

वणी :- वंचित बहुजन आघाडी व श्रीगुरुदेव सेनेच्या संयुक्त उपक्रमातून चालू असलेल्या निराधार शिबिराला गावोगावी प्रचंड प्रतिसादात मिळत असून काल ता. ६ मार्च रोजी कुर्ली येथील संपन्न झालेल्या शिबिरात सर्व निराधारांना व्यसनमुक्तीचा संकल्प करीत दिलीप भोयर यांनी २९ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.
गावोगावी अनेक वयोवृद्ध, विधवा, दिव्यांग असून यांचे कडे शासनाच्या योजना संदर्भात माहितीचा अभाव असल्याने अनेक लाभार्थी वंचित आहे.त्याच बरोबर यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात खर्रा, गुटखा, तंबाकू, तपकीर, बिडीचे घातक व्यसनाधीनता निदर्शनास येत आहे. त्यामुळे गोर गरीब निराधारांना वेसनमुक्त करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष, तथा श्रीगुरुदेव सेनेचे संस्थापक अध्यक्ष यांनी ज्यांच्या ज्यांच्यात व्यसन दिसून येत होते. त्यामुळे दिलीप भोयर यांनी उपस्थितांना अपल्या मार्गदर्शनातून वेसनाधीनतेचे दुष्परिणाम सांगून सर्वांकडून वेसनमुक्तीचा संकल्प करूनच निराधार अर्ज भरून घेतल्या जात होते. आणि व्यसनमुक्तीचा संकल्प दिल्या जात होता. या शिबिराला अध्यक्ष म्हणून कुर्ली ग्रामपंचायतीच्या सरपंच्या सौ. निलिमाताई आसुटकर, तर प्रमुख अतिथी म्हणून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाउपाध्यक्ष मंगल तेलंग , सुभाष परचाके, आदि मान्यवर उपस्थित होते. या शिबाराचे सूत्रसंचालन राहुल जुनगरी यांनी केले तर प्रास्ताविक व आभार अनिल आसुटकर यांनी मानले असून शिबिर यशस्वी करण्यासाठी कवडू कामटकर,आशा सेविका संगीता कामटकर,अतुल मोवाडे मारोती ठावरी,श्रीकांत गेडाम, कवडू भोस्कर यांनी परिश्रम घेतले. या शिबिरात कुर्ली, परमडोह, चनाखा येथील लाभार्थी उपस्थित होते.

खर्रा,व तंबाखूच्या पुड्या फेकल्या

निराधार शिबिरासाठी जे लाभार्थी उपस्थित झाले होते त्यांना वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष तथा श्रीगुरुदेव सेनेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप भोयर यांनी सर्वांना व्यसनमुक्तीचा संकल्प दिल्याने अनेकांनी स्वता जवळील तांबकू, चुना, खर्याच्या पुड्या बाहेर फेकल्या आणि आज पासून व्यसन करणार नाही अशी शपथही घेतली.

पुढील २ आठवडे निराधार शिबिराला स्थगिती

वंचित बहुजन आघाडी व श्रीगुरुदेव सेनेच्या संयुक्तरित्या सुरू असलेल्या एक दिवस निराधारांसाठी हा उपक्रम तूर्तास दोन आठवडे स्थगित आता स्थगीत करण्यात आले आहे. ३१ मार्च मुळे महसूल वर्ष संपत असल्याने शासकीय अडचणी येवु शकतात त्यामुळे दिलीप भोयर यांनी ही स्थगिती दिली असल्याची माहिती वंचितचे प्रसिद्धी प्रमुख रमेश तांबे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.