
झरी (8 जाने):- तालुक्यातील शेकापुर व भेंडाळा येथील दोन शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन,कापूस व स्पिनकलर पाईप चोरी करून नेल्याची घटना घडलू असून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हे नोंद केले आहे.
शेकापुर येथील शेतकरी गणेश रामचंद्र पिदूरकर याला ६ एकर शेती असून तो आपले व कुटुंबाचे उदरनिर्वाह शेतीच्या भरोस्यावर करतो. ७ जानेवारी रोज सकाळी 8९ वाजता शेतात गेला असता गव्हाला पाणी देत असलेले पाईप बोअरवेल जवळ दिसले नाही ते पाहण्याकरिता गोठ्याकडे गेला असता ,बैलगाडित भरून असलेला कापूससुद्धा दिसला नाही. त्यामुळे गणेश याने आजुबाजूच्या शेकऱ्यांना कापूस व स्पिनकल पाईप बाबत विचारणा केली असता कुणालाही माहीत नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुके गणेश याने मुकुटबन पोलीस गाठून तक्रार नोंदविली कापूस ४ °क्विंटल ४५ हजार व १० पाईप ३ हजार असा एकूण ४८ हजाराची चोरी झाल्याच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्ती विरुद्ध कलम ३७९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. भेंडाळा येथील शेकर्यांच्या शेतातून १८ क्विंटल सोयाबीन कुलूपबंद गोठ्यातून अज्ञात व्यक्तींनी चोरून नेल्याची घटना ६ डिसेंम्बर ला घडली याबाबत सुद्धा शेतकरी पुरुषोत्तम विश्वनाथ मेश्राम वय ५० यांनी पोलीस स्टेशनला दिली आहे.
शेतकरी विश्वनाथ यांचे मालकीचे शेत गट क्रं १८६ असून शेतात शेतमाल ठेवण्याकरिता पक्का गोठा बांधलेला आहे. चालु वर्षीचा सोयाबीन पेरनी करुन निघालेल्या ७० क्निन्टल सोयाबीन माल बंड्यात ठेवल्या होता. ६ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजता सुमारास शेतकरी विश्वनाथ
शेतात जावुन बंड्याजवळ गेले असता बंड्याचे घराला लावलेले कुलूप फोडून कब्जा कापुन दिसला व सोयाबीन खाली सांडुन असलेले दिसले त्यामुळे बंड्याच्या आत जावुन पाहणी केले असता भरलेल्या ४० कट्टेपैकी १८ क्विन्टल ;सोयाबीन किंमत ९० हजाराचा माल चोरुन नेल्याची आढळले. सदर सोयाबीनचा माल हा चारचाकी वाहनात घेवुन गेल्याच संशय व्यक्त करण्यात आला कारण शेतातून वाहनांच्या चाकाचे मार्क दिसून आले. अशी तक्रार नोंदविल्यावरून कलम ३८०,४६१ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला. दोन्ही घटनेत चारचाकी वाहनाचा वापर करून चोरी केल्याचा संशय असून यापूर्वी सुद्धा शेकापुर गावातील शेतकर्यांचे सोयाबीन चोरी झाली होती. शेतकऱ्यांच्या शेतातील चोरी प्रकरणात एक टोळी सक्रिय झाल्याची चर्चा सुरू आहे.
दोन्ही चोरीच्या घटनेत शेतकऱ्यांचे १ लाख ३८-हजाराचे नुकसान झाले आहे. वाढत्या चोरीवर अंकुश लावण्याकरिता पोलिसांना चोराचा शोध घेणे एक आवाहनच आहे. चोरी प्रकरणाचा तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप कुमरे,मोहन कुडमेथे, संजय खांडेकर व संतोष मडावी करीत आहे
