
वणी: येथील श्री. संत रविदास चर्मकार समाज सुधार मंडळ,वणी
तसेच राष्ट्रीय चर्मकार महासंघ, यवतमाळ संत रविदास महाराज चर्मकार समाज महिला मंडळ,वणी द्वारा विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त वणी शहरात उन्हातान्हात गटई काम करणाऱ्या चर्मकार समाज बांधवांना कडक उन्हापासून बचावासाठी व्यावसायिक छत्र्या भेट देण्यात आल्या.
सर्वप्रथम वणी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच वणी शहरात सर्व गटई काम करणाऱ्या चर्मकार बांधवांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि व्यावसायिक छत्र्या भेट देण्यात आल्या.
यावेळी श्री.संत रविदास चर्मकार समाज सुधार मंडळ,वणी चे अरुण बांगडे सर, प्रकाश राजूरकर, दीपक हांडे, महेश लिपटे सर, संदीप वाघमारे, भारत लिपटे, योगेश सोनोने, आकाश डूबे, अक्षय टिकले, आशिष डूबे, मंगेश सोनोने, महिला मंडळ तर्फे प्रेमीला सोनोने, आदी सदस्य गण व समाज बांधव उपस्थित होते.
