
प्रतिनिधी:शेखर पिंपळशेंडे, झरी
ग्रामपंचायत पुरड (नेरड) यांचा कडून महाराष्ट्र शासनाच्या नवीन आदेशानुसार आज दिनांक – ६/६/२०२१ रोजी “शिवस्वराज्य दिन” साजरा करण्यात आला. सरपंच सौ. सिमाताई आवारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन तसेच “शिवशंक राजदंड स्वराज्य गुडी” उभारून पुजा करण्यात आली. यावेळी उपस्थित उपसरपंच प्रमोदजी भगत ग्रामसेवक प्रतिक कापसे ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत कर्मचारी व अंगणवाडी सेविका सखुबाई ब्राह्मणे तसेच गावातील महिला व पुरुष हजर होते
