
तालुका प्रतिनिधी :नितेश ताजणे वणी….
आज राष्ट्रीय बेरोजगार दिवस याचे औचित्य साधून काँग्रेस कमिटी वणी तर्फ भाजप सरकार भारतातल्या तमाम युवा बेरोजगारी चा प्रश्न उपस्थित करून जाब विचारण्यात दिवस पाळण्यात आला. श्रमबल सर्वेक्षण असे निदर्शनास आले की एकुण बेरोजगारी चा दर 4.8 टक्का इतका वाढला असुन ही देशातील युवकांसाठी धोक्याची घंटा आहे. याला सर्वस्वी जबाबदार केंद्र सरकार आहे.कारण तरुण वर्ग हा देशाच भवितव्य निश्चित करीत असतो. जर तो शिकुन त्याला नौकरी प्राप्त करुन देण्यास सरकार अयशस्वी ठरत असेल तर काय होईल. उच्च शिक्षित वर्गाला पंतप्रधान “पकोडे तलो और बेचो” असा सल्ला देत असेल तर या देशात काय चालले असा प्रश्न निर्माण होतो. 2016 ला. नोटबंदी केली. काळा पैसा विदेशातुन आणण्याच्या नावाखाली काय झाले? देशात पदवीधर सर्वात जास्त आहे. बड्या बड्या कंपन्यांचे खाजगीकरण होऊन कित्येक रोजगार बेरोजगार होऊ घरी बसले आहेत. वाढती बेरोजगारी, त्यातून निराशा आत्महत्या, गुन्हेगारी प्रव्रत्ती वाढत आहे. वैश्विक स्तरांवर भारत 72 व्या स्थावर आहे. सरकारी मालमत्ता विकणे, या नानाविध अशा समस्या समोर असतांना सरकारला जाब विचारण्या साठी शहर काँग्रेस कमिटी च्या वतीने अध्यक्ष. प्रमोद निकुरे शहर काँ कमेटी, संतोष पुंडलिक पारखी, वणी विधानसभा काँग्रेस कमिटी, ईजहार शेख जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी यवतमाळ, निलेश परगंटीवार, प्रमोद लोणारे, अक्षय धावंजेवार, हर्षल चोपडे, विक्की परगंटीवार, देव इंगळे अभिजात सोनटक्के, दत्ता कापसे यांनी उपविभागीय अधिकारी साहेब, वणी यांना निवेदन देऊन केंद्र सरकार ला बेरोजगार युवक विषयी जाब विचारण्यात आला या प्रसंगी वणी येथील युवा काँग्रेस कमिटीने अनेक सदस्य उपस्थित होते.
