वनपरिक्षेत्रात कार्यरत असलेले अधिकारी सुनील ताजने यांचे दुःखद निधन,सुनील ताजने त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

प्रतिनिधी:शुभम मिश्रा, वणी

वणी वनविभागात कार्यरत असलेले वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील ताजणे यांचे आज दि.२६ एप्रिल ला सकाळी ८ वाजताचे दरम्यान लोढा हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी सुनिल ताजणे हे नोव्हेबर २०१९ रोजी वणी येथे रुजु झाले असुन तेव्हांपासून ते आजपर्यत येथेच कार्यरत होते. विशेष म्हणजे अतिशय शांत व संयमी स्वभावामुळे ते कर्मचाऱ्यांमध्ये लोकप्रिय झाले होते. त्यांचे मागे पत्नी मुले व बराच मोठा आप्त परिवार आहे . त्यांच्या या अचानक सर्वांना सोडुन गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. ईश्वर त्यांचे आत्म्यास चिरशांती प्रदान करो ही प्रार्थना.