
भारतीय जनता पार्टी वणी विधानसभा
स्वतंत्र भारतातील काळा इतिहास म्हणून नोंदल्या गेलेल्या आणीबाणीतील अत्याचार आणि दडपशाहीच्या कहाण्या देशातील तरुण पिढीपर्यंत पोहोचविण्याचा करिता 25 जून रोजी भाजपा तर्फे काळा दिवस पाळण्यात येत आहे.
भारतीय जनता पार्टी वणी तालुका तर्फे आज आणीबाणीच्या काळात आंदोलन करीत असताना मीसाबंदी कायद्याखाली अटक झालेले आंदोलक श्री रफीकजी रंगरेज* यांचा शासकीय विश्रामगृह वणी येथे माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री मा. श्री. हंसराज भैया अहीर *वणी विधानसभेचे कर्तव्यदक्ष आमदार मा. श्री.संजीवरेड्डी बोदकुरवार साहेब* वणी शहर चे नगराध्यक्ष तारेंद्र जी बोर्डे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी श्री.किशोरजी बावणे(जिल्हा सचिव) गजानन भाऊ विधाते(तालुका अध्यक्ष वणी),गंगाधरजी कुठावार तसेच भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ पदाधिकारी व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा वणी तालुका पदाधिकारी, उपस्थित होते.
सत्कारमूर्ती समाजसेवक श्री रफीक जी रंगरेज यांनी आणीबाणी काळात कारागृहात भोगलेल्या यातनांचे* कथन केले. त्याचबरोबर”आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी यांच्या काँग्रेस सरकारने अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व माध्यमांची गळपेची केली. विरोधी नेत्यांना व लाखो लोकांना तुरुंगात डांबले. आणीबाणीच्या विरोधात तत्कालीन जन संघाच्या नेत्यांनी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हजारो कार्यकर्त्यांनी देशभर प्रखर आंदोलने केल्यामुळे इंदीरा गांधींना माघार घ्यावी लागली पुढे ते बोलतांना un आमच्या मनातील स्वप्नं साकार केले. त्या बद्दल त्यांनी पंतप्रधानांचे अभिनंदन केले..
