
शहरातील दामले नगर येथे नळाच्या पाण्याची पाईप लाईन नसल्यामुळे नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नाही.करीता द ग्रेट पिपल्स गृपच्या वतीने दिनेश रायपूरे यांनी २१ मार्च रोजी जिल्हाधिकारी यवतमाळ, तसेच मुख्याधिकारी वणी यांना निवेदन देण्यात आले. दामले नगर येथे नगरपरिषदेने साधारण १५ वर्षा पुर्वी पाईप लाईन टाकली होती.ती पाईप लाईन जिर्ण होऊन फुटली आहे.व बंद पडली आहे.सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. नळाची पाईप लाईन नसल्यामुळे येथील रहिवासी असलेल्या नागरिकांना नवीन नळ कनेक्शन घेता येत नाही.त्या करीता तात्काळ नविन पाईप लाईन टाकण्यात यावी.अशी निवेदनात मागणी केली आहे.
णी:–
