
वणी:- नितेश ताजणे
शहरातील सुतारपुरा येथिल रहीवासी श्री विश्वास विठ्ठलराव बुरडकर यांचे ३ जानेवारी २०२२ ला रात्री ११ वाजता वयाच्या ७२ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले दोन सुना,एक मुलगी व नातवंड आहेत. आज मंगळावार ला मोक्षधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
विश्वास विठ्ठलराव बुरडकर यांचा परिचय
२१ फेब्रुवारी १९४९ रोजी त्यांचा जन्म वणी शहरातील सुतारपुरा येथे राहत्या घरी झाला. १९८४ साली त्यांनी विदर्भातील प्रसिद्ध शासकीय चित्रकला महाविद्यालय नागपूर येथून एटीडी (आर्ट टीचर डिप्लोमा) कोर्स पूर्ण केला आणि विश्वास विठ्ठलराव बुरडकर यांच्या रुपात बुरडकर परिवाराला कलेचा एक वारसा मिळाला. प्रथम त्यांनीच बुरडकर मंडप डेकोरेशन व्यवसायाची सुरवात केली. सुबक मूर्तिकार म्हणून वणी शहरात ओळख देखील मिळवली.
आपल्या कला गुणांनी ९० च्या दशकात प्रसिध्द आले. विवेकानंद विद्यालय येथे कला शिक्षक म्हणून नोकरी केली.
शालेय स्पर्धा व संम्मेलनात विवेकानंद विद्यालयाला कला विभागात अनेक पुरस्कार मिळवून दिले. महाविद्यालयात असतांना अनेक कला प्रदर्शनात त्यांनी पारितोषिक मिळवले, शहरातील अनेक गाजलेल्या समारंभाचे स्टेज त्यांनी साकारले. सुतार समाज वणी च्या वतीने त्यांना समाज रत्न पुरस्कार देऊन २०२० रोजी गौरविण्यात आले. गणेशोत्सव असो वा नवरात्रोत्सव आपल्या कलेसाठी बुरडकर हे नाव कायम चर्चेत असत. त्यांच्या जाण्यामुळे कला क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
