
वणीचे ग्रामिण रुग्णालय नेहमीच कोणत्या ना कोनत्या “कारनाम्याने” चर्चेत येत असुन आज मात्र चिड निर्माण करणारी एक घटना समोर आली आहे. रानडुकराने हल्ला केलेल्या तरुण शेतकऱ्याला उपचारासाठी ग्रामिण रुग्णालय भर्ती केले असता येथिल डॉक्टरांनी पहिले जखमीच्या हातावर काटे मारण्यात आले नंतर एक्सरा काढण्यात आला. या एक्सरा मध्ये चक्क रानडुकराचा दात असतांनाचे दिसुन आले असतांनाही येथिल डॉक्टरांनी तिन दिवस भर्ती राहण्यास सांगीतले परंतु नातेवाईकांच्या सतर्कतेने त्या जखमी तरुणाला येथिल एका खाजगी रुग्णामध्ये भर्ती करण्यात आले. येथे पुन्हा एक्सरा काढण्यात आला यामध्ये चक्क रानडुकराचा दात असल्याचे आढळून आले. खाजगी रुग्णामध्ये स्पष्ट दात दिसुन आला परंतु ग्रामिण रुग्णालयामध्ये काढण्यात आलेल्या एक्सरा मध्ये दात का दिसुन आला नाही असे एक ना अनेक प्रश्न या निमीत्ताने उपस्थित होत असुन मात्र ग्रामिण रुग्णालयाचा चिड निर्माण करणारा भोंगळ कारभार उघडकिस आला आहे.
तालुक्यातील निवली येथील तरुण शेतकरी पवन देवीदास खिरटकर (३०) हा एका लहान मुलासोबत आपले शेतात पायदळ जात असतांना ‘मलाना शिवारात’ ताजने यांचे शेतात रानटी डुकाराने हल्ला केला, यामध्ये पवन खिरटकर जखमी झाला असुन त्याच्या हाताला गंभीर इजा झाली. हि घटना दि.१ ऑक्टोंबर रोजी ११ वाजताचे दरम्यान घडली. यानंतर जखमी पवन ला वणी ग्रामिण रुग्णालयात उपचारासाठी १२ ते १२:३० वाजताचे दरम्यान भर्ती करण्यात आले. सलाईन, इंजेक्शन, देऊन हाताला जखम असल्याने पाच टाके मारण्यात आले. यानंतर चार वाजता त्याचा हाताची क्ष किरण प्रतिमा (एक्सरा) काढण्यात आला, त्यामध्ये हाडाचा तुकडा असल्याचे आढळून आले. परिणामी पवन ला भर्ती राहण्यास सांगण्यात आले व तीन दिवसानंतर टाके खोलून कशाचा तुकडा आहे ? हे पाहू असे सांगितले. परंतु सदर रुग्णाचे नातेवाईकांनी येथे समाधानकारक उपचार होत नसल्याने पवनची सुट्टी करून घेतली आणि वणीतीलच डॉ.खापणे यांचे खाजगी रुग्णामध्ये भर्ती केले. तिथे पुन्हा एक्सरा काढण्यात आला आणी त्यामध्ये चक्क डुकराचा दात दिसुन आल्याने बाहेर काढण्यात आला. या प्रकाराने सारेच चक्क झाले असुन ग्रामिण रुग्णालयात भर्ती ठेवले असते तर पवन ला “जिव गमवावा” लागला असता अशी प्रतिक्रीया उमटत होती. या भयंकर प्रकारामुळे ग्रामिण रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाटयावर आल्याने येथिल परिस्थितीवर रोष व्यक्त केल्या जात आहे.
