चक्क आंदोलन करणाऱ्यानी काढली महावितरण ची अंत यात्रा,हजारोच्या संख्येने मुकुटबंन कार्यालयावर धडकले नागरिक

  • Post author:
  • Post category:वणी

झरी – जामनी :- तालुक्यातील मागील चार महिन्या पासून वीज पुरवठयाच्या लपांडवामुळे संपूर्ण नागरिक त्रस्त होते . बोगस मीटर , सोबत रिडींग घेऊन , अवाच्या-सव्वा बिले देऊन , अश्या विविध तक्रारी असून संपूर्ण नागरिक त्रस्त झाले होते . या विरोधात आज चक्क महावितरण कार्यालय वर महावितरणाची अंतयात्रा काळात तिरडी अदोलन करून जनतेचे लक्ष वेधले .
हे अदोलन मंगेश पाचभाई यांच्या नेतृत्वाखाली आज महावितरण कार्यालय मुकुटबंन येथे मोठ्या संख्येने नागरिक होते . आदोलनात असल्यामुळे संपूर्ण मुकुटबंन शहर आंदोलनामुळे दुमदुमले . अदोलन करणाऱ्याच्या सविस्तर मागण्या , झरी जामनी तालुक्यातील वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा , अधिकारी मुख्यालयी ठेवण्यात यावे , मुकुटबंन येथे वीज दुरुस्ती केंद्र देण्यात यावे , बोगस रिडींग घेणाऱ्यावर कारवाही करण्यात यावे अश्या इतर मागण्या घेऊन आज मुकुटबंन बस स्थानक पासून तर महावितरण कार्यालयापर्यंत तिरडी आंदोलन करण्यात आले , आंदोलनात हजारोच्या संख्येने जनता पोहचत जनतेच्या मागण्या महावितरण अधिकाऱ्यासमोर मांडत निधरषणे केले .
आंदोलाणामुळे महावितरण उपकार्यकरी अभियंता यांनी समस्त जनतेला ग्वाही दिली की , समस्त जनतेच्या समस्या सोबतच मुकुटबंन येथील वितरण केंद्रात वीज बिल दुरुस्ती करीता कर्मचारी राहील , कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्यास आदेश देण्यात आले , तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याकरिता वेळोवेळी मेंटेनन्स ची कामे केली जाणार , तालुक्यातील नादुरुस्त मीटर उपलब्धनुसार लवकरात लवकर बद्दलविले जाणार , त्याचप्रमाणे बोगस रिडींग घेऊन चुकीचे बिले पाठविणाऱ्या एजन्सीवर नियमानुसार कठोर कारवाही करण्यात येईल असे लेखी स्वरूपात देण्यात आले . सोबतच पोलीस विभागाने सुध्दा आंदोलनाला सहकार्य केले . आंदोलनाला उपस्तीत सामाजिक कार्यरते नारायण गोडे , सौ. लक्ष्मी बच्चेवार , जेस्ट नागरिक गोविंदा उरकुडे , अडेगाव सरपंच सीमाताई लालसरे , ग्रा.प.सदस्य सौ. वंदना पेटकर संतोष पारखी , संजय आत्राम , सरपंच खातेरा विशाल ठाकरे , येडशी सरपंच विनोद धोटे , कोसारा सरपंच सचिन गोडे , ग्रा.प.स. मारकी जीवन उलमले व मित्रपरिवार , ग्रा.प.स.पांडरकवडा बाळू चेडे , ग्रा.प.स.तेजापूर शंकर भगत ,ग्रा.प.स.मांगली विलास कसोटे , मंगेश चामाटे व गणेश पेटकर , राहुल ठाकूर ,विजय लालसरे , तालुक्यातील समस्त विद्युत पुरवठामुळे त्रस्त झालेले नागरिक उपस्तीत होते .