
राळेगाव ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ चिमनाणी हे या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या डॉक्टर, आरोग्य सेवक ,सेविका ,परिचर कंत्राटी सफाई कामगार,चालक यांना नाहक त्रास देवुन त्यांचे मानसिक खच्चीकरण करीत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी मनसेच्या वतीने जिल्हाध्यक्ष देवाभाऊ शिवरामवार यांच्या नेतृत्वात मनसे तालुकाध्यक्ष शंकर वरघट मनविसे तालुकाध्यक्ष शैलेश आडे व पिडीत आरोग्य कर्मचारी यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सौ तरंग तुषार वारे यांना दि.२२सप्टेंबर२०२१ रोजी निवेदन दिले होते व ७ दिवसाच्या तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता तसेच आज दि.२३सप्टेंबर २०२१ रोजी आरोग्य उप संचालक अकोला डॉ. राजकुमार चव्हाण साहेब हे वणी येथे आले असता त्यांच्यासमोर मनसे राज्य उपाध्यक्ष राजुभाऊ उंबरकर यांनी हा प्रश्न मांडला असता आरोग्य उपसंचालक यांनी तत्काळ त्या वैद्यकीय अधिक्षकाची बदली करण्याचे आदेश जिल्हा शल्य चिकित्सक मॅडम यांना दिले. त्यावरून येत्या एक ते दोन दिवसात त्यांची बदली करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली यावेळी मनसे राज्य उपाध्यक्ष राजुभाऊ उंबरकर मनसे राळेगाव तालुकाध्यक्ष शंकर वरघट, मनविसे तालुका अध्यक्ष शैलेश आडे व राळेगाव ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.
