
वणी तालूक्यातील घोन्सा-कायर जि,प,क्षेत्रात असणार्या कोळसा स्टोन लाईम डोलामाईट आणि खदानीच्या परिसरात लगत असणाऱ्या गावांना खनिकर्म विभागातील राॅयल्टीचा निधी परिसरातील गावांना दिला गेला नाहीत्यामुळे समस्याग्रस्त गावातील विकास कामाकरिता प्रधानमंत्री जिल्हा खनिज विकास निधी प्रतिष्ठाण समितीच्या निधीतून समस्याग्रस्त गावांंच्या निधीच्या प्रस्तावास प्रशासकिय मांन्यता देण्यात यावी,तसेच शेतकर्यांना दिवसा विद्यूत पूरवठा व्हावा याकरीता सौरउर्जा प्रकल्प उभारण्याकरिता व सिंचन वाढीकरीता विदर्भा नदी व निर्गुडा नदीवर बंधारे बांधण्याकरिता प्रधानमंत्री जिल्हा विकास निधीतून गाव तलावात साठवन क्षमता वाढावी याकरिता निधी देण्यात यावा तसेच पशूसवर्धन विभागामार्फत दूधाळ पशू खरेदी योजनेचा लाभ मिळण्याकरीता घोंन्सा-कायर जि,प, क्षेत्रालगतच्या घोन्सा,सोनेगाव,बोर्डा,रासा,पिल्कीवाढोणा,मारेगाव कोरंबी,सुकनेगाव,साखरा,गोडगाव,परसोडा,इजासन गावालगतच्या जंगलातील वाघा सारख्या हिंस्त्र प्राण्याचा बंदोबस्त करावा,कूंभारखणी-घोन्सा कोळसा खदानीमुळे प्रदूषणात मोठ्या प्रमाणात झालेली वाढ,ब्लाॅस्टिंगमूळे तीव्र धक्के या विविध समस्याचे निवेदन जि,प,गट नेत्या मंगलाताई दिनकरराव पावडे,प,स, सदस्य महेश उराडे,इंदिरा सूतगिरणीचे संचालक दिनकर पावडे यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ तथा अध्यक्ष प्रधानमंत्री जिल्हा खनीज विकास प्रतिष्ठाण समिती यवतमाळ यांना दिले आहे
