
.
वणी तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या इजासन (गोडगाव ) येथे अवैध दारू विक्री व्यवसाय चांगलाच जोमात सुरू आहे
गेल्या ३ते४ वर्षापासून गावात अवैध देशी दारु विकल्या जात असून मुकुटबन पोलिस या अवैध दारूविक्रीकडे सर्रास दुर्लक्ष करीत असल्याचे दिसुन येत आहे तर इजासन (गोडगाव ) वणी तालुक्यात आणि विदर्भात भवानी माता मंदिरामुळे प्रसिध्द आहे मंदीरात विदर्भातील आणि बाहेर राज्यातील भक्तगण दर्शनाला येतात
तेंव्हा भक्तगण मंदीरात न जाता सरळ दारू अड्याकडे धाव घेतांना दिसुन येतात आणि तेच भक्तगण मंदीरातील शांत वातावरणाचा भंग करतातत्यातच इजासन गावात अवैध दारू विक्री व्यवसाय चांगलाच फोफावला असून साखरा दरा गोडगाव कुंभारखणी या गावातील मद्यशौंकिन दारु पिण्यासाठी दररोज हजेरी लावतात तेंव्हा तेच दारुडे दारु पिल्यानंतर गावातील प्राथमिक शाळेजवळ आणि मुख्य चौकात जावून धिंगाणा घालतात तेव्हां त्यांचा त्रास महीला विद्यार्थी शाळेतील शिक्षक यांना सहन करावा लागतोतर गावात नेहमी दारूमुळे तंटे उद्धभव असुन तनाव निर्माण होत आहे अनेक युवक वेसनाच्या आहारी गेले आहे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे गावातील कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजत आहे तर या दारुविक्रीला मुकुटबन पोलिस स्टेशनमधील काही पोलिसांचे पाठबळ असल्याची इजासन गावात जोरदार चर्चा रंगत आहे
त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षण करणाऱ्या पोलिसांनी दारू विक्रिकडे दुर्लक्ष न करता दारू विक्रीला आळा घालण्याची गरज आहे
प्रत्येक सणाला दारू विक्रीतून कमाई करू अशी दारू विक्रेत्यांना लागून आहे लालूच
वर्षभरात येणाऱ्या सणाला प्रत्येक माणसाकडे पैसै असते आणि त्या पैशातून आपली वेशन भागवितात तेंव्हा अवैध व्यावसायिक आपली कमाई कोणत्या सणाला कशी होईल त्यानुसार ते सणाची वाट पहात असते आणि त्यानुसार दारूची साठवणुक करतातव्यवसायाला पोलिसांचा पाठिंबा असल्याची चर्चा इजासन गावात असलेल्या दारू विक्रीला मुकुटबन पोलिसांचा पाठींबा असल्याची व दारू विक्रेत्याकडून चिरीमिरी घेत असल्याची जोरदार चर्चा गावात चांगलीच रंगत आहे
