
प्रतिनिधी:नितेश ताजने,वणी
वणी शहरासह तालुक्यातील वाढती कोरोना रूग्ण संख्या लक्षात घेता आरोग्य विषयक समस्यांवर मात करण्याच्या दृष्टीने वणी विधानसभा श्रेत्राचे आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांनी सोमवारी दि.१२ एप्रिल रोजी तहसिल कार्यालयातील महसुल भवन येथे आढावा बैठक घेतली.
या बैठकीत पंचायत समिती सभापती संजय पिंपळशेंडे, उपविभागीय अधिकारी डॉ.शरद जावळे, तहसिलदार शाम धनमने यांच्यासह मुख्यधिकारी संदिप माकोडे, गटविकास अधिकारी राजेश गायनार, बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता तुषार परळीकर, तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. विकास कांबळे,ग्रामिण रुग्णालयाचे अधिक्षक धर्मेन्द्र सुलभेवार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
सध्या कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने रौद्र रूप धारण केले असून याचे पडसाद वणी शहरासह ग्रामीण भागातही सर्वत्र दिसून येत आहे. वणी तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सद्या बंद असलेले परसोडा कोविड सेन्टर सुरु करण्याच्या सूचना दिल्या असुन यासोबतच एंबुलेंसची व्यवस्था, कोविड रुग्णालयातील बेडची संख्या वाढविणे, फ्रंट लाइन वर्कर, स्वस्त धान्य पुरवठादार तसेच गँस सिलेंडर पुरवठादारांना लसिची व्यवस्था करण्यासह विविध उपाय योजना राबविण्याच्या सूचना आमदार बोदकुरवार यांनी केल्या तसेच पंचायत समिती सभापती संजय पिंपळशेंडे यांनी तालुक्यातील गठीत असलेल्या समित्यांना कार्य करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता तुषार परळीकर यांनी कोविड रुग्णांची मोठी आर्थिक लुट होत असल्याची चिंता व्यक्त केली असून याकडे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते.
