

प्रतिनिधी:- शेखर पिंपळशेंडे
सध्या कोरोना व्हायरसचा (कोविड-19) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे याच्यावर आळा घालावा म्हणून प्रशासनाच्या वतीने काही मार्गदर्शक सूचना निर्देशित केल्या आहेत.तरीही अनेक नागरिक या सूचनांचं पालन करताना दिसत नाही. कडक निर्बंध लागू असतांना सुद्धा नागरिक ह्या सुचना गांभिर्याने घेतांना दिसत नाही.
त्यामुळे आज तालुक्यातील पुरड( ने) येथे कोरोना चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.यामध्ये गावातील १५८ नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली.यावेळी आरोग्य सेविका शिल्पा फुलमाळी, आरोग्य सेवक श्री खडतकर ,कु. नेहा मिसाळ, कृषी अधिकारी श्री. यादव साहेब, सरपंच सौ. सिमाताई विशाल आवारी ,ग्रामसेवक प्रतीक कापसे पो. पाटील प्रविणजी भगत,तलाठी नेहारे साहेब ग्राम पंचायत सदस्य तानाजी मोहितकर तसेच ग्रामपंचायत कर्मचारी व इतर कर्मचारी उपस्थित होते.
