अखेर त्या ४५ लाखाच्या लुटमारीतील एका आरोपिला राजस्थान तर दुसरा वणीतुन अटक, पाच दिवसाचा पीसीआर

प्रतिनिधी:नितेश ताजने,वणी

भरदिवसा जिनिंग सुपरवायझरला मारहान करुन ४५ लाख रुपयेची लुटमार करुन राजस्थान मध्ये पळुन गेलेल्या आरोपीच्या मुसक्या बांधुन सिद्ध करून दाखवले.
वणी येथील निळापूर ब्राम्हणी रोड वर भरदिवसा एका जिनिंग सुपरवायझरला मारहान करुन ४५ लाखाची रक्कम पळवुन नेणाऱ्या आरोपीला अखेर राजस्थान मधुन अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
सविस्तर वृत्त असे की, २० मार्च २०२१ रोजी दुपारी ३ वाजताच्या दरम्यान जिनिंग सुपरवायझर मनिष जंगले हा कापसाचा चुकारा करण्यासाठी वणीवरुन आपल्या दुचाकीने निळापूर ब्राम्हणी रोडवरील जिनिंग मध्ये ४५ लाखांची रोकड बैगमध्ये घेऊन जात होता. दरम्यान मागावर असलेल्या पांढर्‍या रंगाच्या कारने त्याच्या दुचाकीला धडक दिली यामध्ये मनीष खाली पडला तेव्हा कारमधून दोन ईसम खाली उतरून एकाने त्याचे तोंड दाबले व दुसऱ्या व्यक्तीने मारहान करुन बैग हिसकाऊन कारने फरार झाले. तेव्हांपासून पोलीस आरोपींच्या शोधात होते. पुलिस के हात बहुत लंबे होते है म्हणत अखेर या घटनेतील आरोपी बाबुलाल बिश्नोई (36)याला राजस्थान येतील जोधपुर लोहावत गावातून तर पुखराज चौधरी(३५)रा.छोरीया ले आऊट वणी याला पोलिसांनी अटक केली आहे.
बाबूलाल बिश्नोई हा मागील 15 ते 16 वर्षापासून वणी परिसरात वास्तव्य करून,जिनिंग मध्ये लेबर सप्लायरचे काम करित होता. दरम्यान बाबूलाल याची नजर जिनींगमधिल कापसाच्या चुकार्यावर पडली आणि तेथुनच त्याने पाळत ठेवणे सुरु केले, दरम्यान दि.२० मार्च रोजी दुपारी ३ वाजताच्या दरम्यान जिनिंग सुपरवायझर मनिष जंगले हा आपल्या दुचाकीने ४५ लाख रुपये कापसाचा चुकारा घेऊन निळापूर ब्राम्हणी रोडवरील जिनिंगकडे निघाला, परंतु त्याला काय माहित आपल्या पाठिमागे लुटारु आहे म्हणून, मनिष अहफाज जिनिंग जवळ जाताच मागुन एका चारचाकी वाहनाने त्याच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये मनीष खाली पडला तेव्हा चारचाकी वाहनातुन दोन व्यक्ती खाली उतरले व एकाने मनिष चे तोंड दाबले तर दुसऱ्याने मारहान करुन ४५ लाख रुपयेची बैग हिसकाऊन कारने पळून गेले.तेव्हांपासून आरोपी फरार होते.
यवतमाळचे सहा पोलीस निरीक्षक गजानन करवडे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक राजस्थान येथील जोधपूर जिल्ह्यात पाठविन्यात आले. व मुख्य आरोपीला अटक केली तर दुसरा आरोपी पुखराज चौधरी(३५)रा.छोरीया ले आऊट वणी येथील असून इतर फरार आरोपींना लवकरच बेड्या ठोकणार असा दावा पोलिसांनी केला आहे. आरोपीला अटक करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे ,उपविभागीय पोलीस अधीक्षक संजय पुजलवार वणी, पोलीस निरीक्षक वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि/ गजानन करवडे ,स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नी प्रदीप परदेशी, डी.बी पथक प्रमुख पोउनी/गोपाल जाधव, गजानन डोंगरे ,उल्हास कुरकुटे यांनी कारवाई पार पाडली.