
शहरातील सिंधी कॉलनीतील श्रावणी बिअर बार जवळ मटका सुरू असल्याची माहिती ठाणेदार शाम सोनटक्के यांना मिळताच त्यांनी पोलीस उपनिरीक्षक शिवाजी टिपूर्णे, सुदर्शन वानोळे, अशोक टेकाळे, हरींदर भारती, अमोल नूनेलवार, विशाल गेडाम,आदींसह लपत छपत जाऊन मटका जुगारावर पैशाच्या खेळ खेळविणाऱ्या टापू उर्फ अब्दुल हाफिज अब्दुल सत्तार ४०,मोमीनपुरा, अब्दुल रज्जाक,शेख मुख्तार ३५ मुकुटबन या दोघांना १५ हजार सातशे ६० रुपयांच्या मुद्देमालासह ताब्यात घेऊन अटक केली आहे. सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात करण्यात आली आहे. मात्र पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक ठिकाणी मटका व्यवसाय तेजीत असल्याचे दिसून येत आहे. यावर निर्बंध घालण्याची मागणी सामान्य जनतेतून
