
तालुका प्रतिनिधी,झरी:- पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या दुर्गापूर येथिल तरुणाने एक १३ वर्षीय अल्पवयीन मुलीची छेडखाणी केल्या प्रकरणी विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
तालुक्यातील एक १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या मामा सोबत राहत असून २५ मार्च रोज सकाळी ९.३० वाजता आपल्या मैत्रीनी सोबत झरी येथील शाळेत जाते. दुर्गापूर येथील सुमित भोयर वय २० वर्ष हा गेल्या ६ ते ७ महिन्यापासून शाळेत जात असताना वाईट उद्देशाने टोंनटिंग करून पाठलाग करीत पाहत होता. मुलीचे मामा व मामी काही बोलणार म्हणून मुलगी घाबरून काहीही सांगितले नाही.२३ मार्च रोज सकाळची शाळा ९.३० ला सुटली
मुलगी
शाळेतून घरी गावाकडे जात असताना बोरुले यांचे शेताजवळीस रस्त्यात सुमित श्रीराम भोयर रा र्दुर्गापूर पाठीमागे आला व मुलीला थांबवून मी तुझ्यासोबत लग्न करतो तु मला नकार का देत आहे असे म्हणून तु जर मला नकार देत असशील तर मी माझे जिवाचे काहीही बरेवाईट करीन असे म्हणून त्याने माझे चाईट उद्देशाने हात पकडून स्वता कडे ओढले व कपडे ओढु लागला व तु जर कोणालाही सांगशील तर तुला जिवाने मारुन टाकीन किव्हा मी माझे स्वताचे काहीही बरे वाईट करीन अशी धमकी दिली. तेव्हा मुलगी तेथून घरी गेली व तिच्या मामीला सांगितले. मुलीच्या मामला ही माहिती देताच मामाने पाटण पोलीस गाठून पिडीत मुलीला तक्रार दिली. यावरूम पोलिसांनी आरोपी सुमिय भोयर विरुद्ध कलम ३५४ (ब) ३५४ (ड) भादवि सह कलम ८,१२ बाल लैंगिक अत्याचार अंतर्गत गुन्हे दाखल करून आरोपीस अटक करून कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.सादर प्रकरणाचा तपास ठाणेदार संगीता हेलोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दुर्गालाल टेंभरे करीत आहे.
