लाठी येथे मोफत ई श्रम कार्ड नोंदणी व वितरण राहुल खारकर यांचा स्तुत्य उपक्रम ई श्रम नोंदनीचा कामगारांनी घेतला लाभ

  • Post author:
  • Post category:वणी

आज दिनांक 23 जानेवारी रोज रविवार ला लाठी येथे ई श्रम कार्ड च्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या आर्थिक सुरक्षेसाठी सरकार कडून अनेक विधायक पाऊले उचलेली जात आहे अश्या सर्व लोकांसाठी ई श्रमिक कार्ड योजना लागू करण्यात आली आहे या अंतर्गत कामगारांना सर्व सरकारी योजनांचा लाभ मिळणार आहे सरकारी योजनेपासून एकही कामगार वंचित राहू नये यासाठी लाठी येथील ग्रामपंचायत सदस्य राहुल खारकर यांनी या शिबिराचे आयोजन केले होते.
सरकारी विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी कामगारांना ई श्रम पोर्टल वर नोंदणी करावी लागणार आहे त्यांनतर देशातील कोणत्याही काना कोपऱ्यात काम करणाऱ्या कामगारांना विविध सरकारी योजनांचा लाभ घेता येणार आहे प्रत्यक्षात हे कार्ड 16 ते 59 वयोगटातील कामगारांसाठी असून रजिस्टेशन ऑनलाईन करता येणार आहे अर्ज न करता योजनेपासून वंचित राहू नये यासाठी हा कॅम्प लाठी येथील जिल्हा परिषद शाळेत आयोजित करून नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली होती.यावेळी लाठी येथील पोलीस पाटील संजीवनी खिरटकर,तथा प्रकाश चार्लीकर यांचे सहकार्य मिळाले अशी माहिती राहुल खारकर यांनी दिली.