वणी शहरातील ओबीसी मोर्च्यात ओबीसीवादी चळवळीच्या पदाधिकाऱ्यांचा सक्रिय सहभाग

  • Post author:
  • Post category:वणी

प्रतिनिधी:शुभम मिश्रा,वणी

ओबीसी समाजातील (VJ, DNT, NT, SBC)प्रवर्गाची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी तसेच ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी राज्यभर विविध माध्यमातून एकत्र येण्यास सुरुवात झाली आहे.ओबीसीवादी चळवळी चे राष्ट्रीय अध्यक्ष संजयजी कोकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ओबीसीवादी चळवळी चे विदर्भ प्रमुख शरदजी तराळे ,विदर्भातील वेगवेगळ्या तालुक्यातुन आलेले पदाधिकारी उपस्थित होते. संजय चिंचोलकर,निदेश हनुमंते,प्रसन्न बुटले, राकेश दिकुंडवार,हितेश कडू,धीरज लाकडे,,विशाल जसवंते,नितेश ताजने,गणेश सोनूले,वैभव राऊत,जितू पाऊनकर व समस्त ओबीसीवादी चळवळीच्या पदाधिकारी सक्रिय सहभाग घेत ओबीसी समाजाच्या समस्या शासनापर्यंत स्थानिक आमदार मा, संजय बोदकुरवार यांच्यामार्फत पोहचविण्यात आल्या.