सुकनेगाव ते गोडगाव रस्ता प्रतीक्षेतच, स्थानिक प्रतिनिधी चे जाणीवपूर्वक दुर्लक्ष,गावकऱ्यांचे हाल

  • Post author:
  • Post category:वणी

रस्त्यासाठी नागरिक करीत आहे प्रयत्न

प्रतिनिधी: योगेश तेजे (कायर )

लोकहीत महाराष्ट्र वणी ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा

https://chat.whatsapp.com/HF7cz25Rck5K7Yy2CBFXyu

देशाला स्वातंञ्य मिळुन सत्तरी ओंलांडली त्यांनतरही सुकनेगाव ते गोडगाव हा चार किलोमीटर अंतर असलेला रस्ता अजुनही बनण्याच्या प्रतिक्षेत आहे या रस्त्याची निर्मीती 1970 ते 1975 या काळात झाली होती तेव्हा या रस्त्यावर खडीकरण झाले होते पण 1970 ते 75 या चाळीस वर्षांच्या काळात या रस्त्याचे खडीकरण किंवा डांबरीकरण केले नाही त्यामुळे गोडगाव येथील नागरिकांनी रस्त्याचे डांबरीकरन करुन घेण्याकरिता जुंलै महिण्यात आमदारांना निवेदन दिले होते
वणी तालुक्यातील सुकनेगाव ते गोडगाव हा रस्ता अतिशय प्रवाशांच्या सोयीने आवश्यक ठरणारा आहे तसेच याच मार्गावर ईजासन (गोडगाव) येथील भवानी मातेचे मंदिर तर सुकनेगाव येथील सुकाई मातेचे मंदिर आहे या मंदिरात विदर्भ मध्यप्रदेश आंध्रप्रदेश या राज्यातुन भाविक दर्शनासाठी येतात तर साखरा बोपापुर परसोडा ईजासन गोडगाव येथील नागरिकांना प्रवासासाठी सोयीचा होईल त्यामुळे हा रस्ता तयार झाल्यास आमचा फेरा वाचेल यासाठी आमदारांना निवेदन दिले होते असे गावातील नागरिकांनी सांगितले आहे.