
वणी:- येथील पंचशील भागात राहणाऱ्या २४ वर्षीय तरूणाने २१ वर्षीय महिलेशी ओळख निर्माण करीत लग्नाचे आमिष दाखवत सतत बळजबरीने अत्याचार करणाऱ्या तरुणाविरुद्ध पीडितेने पोलिसात तक्रार देताच त्याला गजाआड केल्याची घटना गुरुवारी रात्री चे सुमारास उघडकीस आली आहे.
शहरातील पंचशील भागात राहणाऱ्या मयूर उर्फ साजिद खा साहेबां खा पठाण या २४ या तरुणाची त्याच भागात राहणाऱ्या २१ वर्षीय विवाहित तरुणीशी फेसबुक च्या माध्यमातून ओळख झाली होती. त्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. पीडितेचा पती घरात नसतांना मयूर चे येणे जाणे वाढले. यातच त्यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. मयूर पीडितेच्या घरात पती नसतांना यायचा आणि तिच्याशी वारंवार बळजबरीने संबंध प्रस्थापित करायचा. पीडितेने संबंधाला विरोध करताच तुझ्या मुलीचा सांभाळ करून लग्न करण्याचे आमिष दाखवीत होता. ६ जानेवारी रोजी पीडितेचा पती घरात नसल्याची संधी साधून मयूर पीडितेच्या घरी सायंकाळी ५ वाजताचे सुमारास आला त्यावेळी पीडिता तिच्या दोन मुलीसह घरात होती. प्रसंगी मयूर ने पीडितेला मुलीचा सांभाळ करून लग्न करण्याचे आमिष दाखवून बळजबरीने तिच्यावर अत्याचार केला सदरचा प्रकार पीडितेच्या पतीच्या लक्षात आल्यावर त्याने तिच्यापासून अलग होण्याचा निर्णय घेतला. इकडे मयूर ने नकार दिला असल्याची तक्रार विवाहित तरुणीने पोलिसात गुरुवारी रात्री दिली त्यावरून पोलिसांनी भा दं वि ३७६, (२)(N),४१७, ५०६ कलमान्वये गुन्हा नोंद केला आणि मयूर ला गजाआड केल्याची घटना घडली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण हिरे करीत आहे.
