
वणी – यवतमाळ चंद्रपूर जिल्ह्याला जोडणाऱ्या वणी ते कोरपना राज्य महामार्गावर प्रवास करताना रस्त्याच्या अत्यंत दुरवस्थेमुळे
जुन्या काळातील बैलबंडी मार्गाच्या प्रवासाची आठवण होत असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होते आहे.
बोरी – कोडशी खू नदी घाटावर
पुल होण्यापूर्वी नागरिक दगडधोंड्याच्या खडतर रस्त्यांनी बैलबंडीने वणी ते कोरपना प्रवास करायचे. कालांतराने या मार्गाचे खडीकरण करण्यात आले. १९९८- ९८ दरम्यान या रस्त्याचे संपूर्ण डांबरीकरण करण्यात आले. त्यामुळे प्रवास योग्य गुळगुळीत रस्ता बनला. मात्र गेल्या दोन दशकापासून या रस्त्याच्या दुरुस्ती कडे होणाऱ्या सातत्याने दुर्लक्षामुळे सद्या जुनीच वेळ नागरिकांना प्रवासासाठी आली आहे. या मार्गाच्या निर्मितीनंतर अनेक पटीनी जाणार येणाऱ्या वाहनांची व नागरिकांची संख्या वाढली.
एकीकडे सर्वत्र महामार्ग चौपदरीकरण होऊन गुळगुळीत बनले जात असताना. या मार्गाला खड्ड्यांची साडेसाती लागलेली आहे. त्यामुळे वाहतूकदाराना उलटपक्षी विविध आजार जडले जात आहे. सद्यस्थितीत या रस्त्यावर वाढलेल्या वाहतूकमुळे नुसते डांबरीकरण आता पुरे नसून नेहमीच होणाऱ्या दुरावस्थेला रामबाण उपाय म्हणून कॉंक्रिटीकरण करून चौपदरीकरण करण्याची गरज व्यक्त होत आहे. यावर लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
रस्त्यामुळे बसची संख्या अत्यल्प.
वणी ते कोरपना हा अत्यंत महत्वाचा मार्ग आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून झालेल्या रस्त्याच्या अत्यंत दुरवस्थेमुळे वाहतूकदारांचे कंबरडे मोडले जात आहे. वाहनांचे नुकसान होते आहे. परिणामी या मार्गावर बोटावर मोजण्याइतपतच बसेस धावताना दिसतात. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
