
ग्रामपंचायत खडकी गणेशपुर येथे गेल्या अनेक वर्षा पासून दूषित पाणी मिळत होते त्यामुळे अनेक आजाराचा सामना करावा लागत होता ही बाब ग्रामपंचायत चे सरपंच व उपसरपंच सदस्य यांनी लक्षात घेत जल शुध्दी करण यंत्रा ची मागणी पंचायत समिती मार्फत जिल्हा परिषद यवतमाळ येथे केली. जिल्हा परिषद व ग्रामपंचायत च्या सहकार्यातून आज आर ओ फिल्टर चे उद्घाटन सरपंच शुभांगी राजू लोडे व उप सरपंच व सदस्य यांनी केले. त्या वेळी गावातील नागरिक उपस्थित होते. गणेशपूर येथील जनते कडून सरपंच व उपसरपंच सदस्य यांचे कवतुक होत होते
