

वणी :शुभम मिश्रा,वणी
तालुक्यातील घोन्सा – सोनेगाव शिवारातील आसंन या गावाच्या नाल्यात एका वाघाचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्याने एकच तारांबळ उडाली असून घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी उपस्थित झाले असुन पंचनामा सुरू आहे.
आज दि.२३ मार्च रोजी दुपारी घोंसा-सोनेगाव शिवारातील आसन च्या नाल्यात एक वाघ मृतावस्थेत शेतकऱ्यांना आढळून आला. या घटनेची माहिती लगेच वनविभागाचे अधिकाऱ्याना देण्यात आली.त्या माहितीनुसार
वनाधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा सुरू आहे.
