
“गेली नव्वद वर्षे झालीत पण ओबीसी (VJ, DNT, NT, SBC) प्रवर्गाची जातीनिहाय जनगणना झाली नाही. सन 1931 ला भारतात ओबीसींची जातीनिहाय जनगणना झाली होती. तेव्हापासून आजपावेतो ओबीसींची स्वतंत्र जातीनिहाय जनगणना झाली नाही. आजपर्यंत ओबीसी समाजाची आकडेवारी कळली नाही. त्यामुळे ओबीसी समाज अनेक सुविधेपासून वंचित आहे. ओबीसी प्रवर्गाची जातीनिहाय जनगणना झालीच तर शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय ठिकाणी हक्क व अधिकार मिळेल.”
यासाठी संपूर्ण गावागावात ओबीसी जनजागृती रॅलीचे आयोजन सुरू आहेत. वणी शहरातील तेली समाज एकत्र येत ओबीसी मोर्चाला जाहीर पाठिंबा देत आज संताजी इंग्लिश मीडियम स्कूल वणी येथे सभा घेण्यात आली .या बैठकीला श्री संताजी ज्ञान प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मान, संजय चं, पोटदुखे, तसेच उपाध्यक्ष मा,रमेश येरने सचिव मान, धनंजय आंबटकर सहसचिव मा, ओमप्रकाश निमकर, तसेच संचालक, मा, तानाजी पाऊनकर, मा, वसंतराव महाकरकर,मा, दिलीप पडोळे,मा,भरत गंधारे,मान, विलास क्षीरसागर मा,मंगेश येनूरकर, संचालिका श्रीमती शोभाताई गंधारे तसेच श्री संताजी युवा मंचचे ,शरद तराळे,
,अभिजीत येरने,अक्षय पोटदुखे,वसंत तलसे,उमेश गंधारे ,अजय पोहाणे,प्रीतम महाकरकर,प्रसन्ना बुटले,विशाल लिचोडे,राजेश पारोधी, सुभाष सातपुते,अजित भटगरे, व समस्त समाजबांधव उपस्थित होते.
