वणी शहरात संत रविदास महाराज जयंती सोहळा संपन्न

  • Post author:
  • Post category:वणी

प्रतिनिधी:नितेश ताजने,वणी

वणी: समतेचे अग्रदूत संत रविदास महाराज यांची ६४४ वी जयंती श्री. संत रविदास महाराज चर्मकार युवा मंच,वणी द्वारा संत रविदास महाराज सभागृह येथे अगदी साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली.

“करम बंधन में बंध रहियो,
फल की ना तज्जीयो आस।
करम मानुष का धर्म है,
सत् भाखै रविदास।”

“मन चंगा तो काटोंती में गंगा”

“ऐसा चाहू राज मैं,जहाँ मिले सबन को अन्न।
छोट बडे सब सम बसे,रविदास रहे प्रसन्न।”
असे परिवर्तनवादी,समतावादी विचार मांडणारे महान संत रविदास महाराज यांची जयंती वणी उपविभागीय क्षेत्रातील चर्मकार बांधवांतर्फे गेले ४-५ दशके दरवर्षी नित्यनेमाने मोठ्या उत्साहात साजरी केली जाते,यावर्षी सुद्धा त्याच जोमाने जयंतीचा १ दिवसीय ३ टप्प्यात कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात सकाळी ६ वाजता नगर सेवा समिती,वणी व संत रविदास महाराज चर्मकार युवा मंच,वणी यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथील संत रविदास सभागृह परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.नंतर सकाळी ९ वाजता वणी शहरातील संत रविदास नगर येथील प्रतिमेस अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला.लगेच सकाळी १० वाजता कार्यक्रमाचे मुख्य स्थळ संत रविदास सभागृहात भव्य कार्यक्रमात दीपप्रज्वलन व प्रतिमेस माल्यार्पण जेष्ठ समाजबांधव मा.नामदेवराव धुळे,मा.बाबाराव पिंपळकर,मा.संबा वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच जयंती निमित्य समाजबांधवांनी प्रतिमेस अभिवादन करून मार्गदर्शनपर विचार प्रकट केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.सोनी कुरील,प्रास्ताविक व आभार प्रदर्शन रवींद्र धुळे यांनी केले.
या प्रसंगी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हा,तालुका पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते,या कार्यकर्माच्या यशस्वीतेसाठी आयोजक संत रविदास महाराज चर्मकार युवा मंच,वणी चे पदाधिकारी,सदस्य तसेच संत रविदास जयंती उत्सव आयोजन समिती व समाजबांधवांनी परिश्रम घेतले.