
दानिश गाफ्फार शेख यांच्या शेतातील विहिरी मध्ये दोन साप असल्याचे नरेश दारसावार यांनी वन्य जीव रक्षक टीम चे सदस्य संतोष गुम्मुलवार यांना ४:४५ वाजता फोन करून कळवले व ते सर्व सर्प मित्र टीमचे सदस्य घेऊन दानिश गफ्फार शेख यांच्या शेतातील विहिरी मधील अती विषारी नाग व घोणस जातीचा साप यांना बाहेर काढण्यास ३ तासाच्या अथक प्रयत्नाना यश मिळाले. वन्य जीव रक्षक मुकूटबन येथील सर्प मित्र टीम चे सदस्य संतोष गुम्मुलवार, जगदीश कुडलवार, राहुल पुल्लीवार, गोकुल पोलशेट्टीवार, कार्तिक नाईनवार, संदीप धोटे व समस्त सर्प मित्र टीम तसेच फॉरेस्ट ऑफिसचे अधिकारी कुणाल सावरकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ८: १५ वाजता मुकूटबन बिट मध्ये सोडण्यात आले.
