शहिद दिनानिमित्य निराधार शिबीर संपन्न,परमडोह येथे २५ निराधार लाभार्थ्यांची निवड

वणी :- तालुक्यातील परमडोह येथे २३ मार्च शहीददिना निमित्य २७ मार्च रोजी दुपारी १२ वाजता सार्वजनिक सभागृहात निराधार मार्गदर्शन शिबिर वंचित बहुजन आघाडी व श्रीगुरुदेव सेनेच्या माध्यमातून करण्यात आले यावेळी २५ लाभार्थ्यांची निवड
करण्यात आली .

श्रीगुरुदेव सेनेचे संस्थापक अध्यक्ष व वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष दिलीप भोयर यांनी एक दिवस निराधारांसाठी हा उपक्रम सुरू केला असून या उकल्पक्रमांतर्गत देशाच्या स्वातंत्र लढ्यातील वीर क्रांतिकारी भगतसिंह , सुखदेव , राजगुरू, चंद्रशेखर आझाद यांच्या स्मृतीस वंदन करून परमडोह येथे निराधार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करन्यात आले होते
या शिबिराला प्रमुख अतिथी म्हणून वंचितचे जिल्हाउपाध्यक्ष मंगल तेलंग परमडोह ग्राम पंचायतचे सरपंच मधुकर वाभिटकर उपसरपंच सोमेश्वर टेकाम सामाजिक कार्यकर्ते संदीप थेरे, पुंडलीकराव मोहितकार, प्रतिमा मडावी मीनाताई ढवळे, आदि मान्यवर उपस्थित होते. या शिबिराला नागरिकांनी उत्फुर्त प्रतिसाद दिला असून यात गोरगरीब वयोवृद्ध, विधवा माता बघिनी, व दिव्यांग असे २५ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. यावेळी ग्राम पंचायतीचे कामकाज राष्ट्रवंदनने करण्याच्या मागणीचे निवेदन सरपंच मधुकर वाभीटकर यांना देण्यात आले व राष्ट्रवंदना घेऊन शिबिराची सांगता करण्यात आली.