
वणी : नितेश ताजणे
वणी येथील तरुणाचा मृतदेह कोराडी नागपूर येथे कोळशाच्या ढिगाऱ्यात आढळल्याच्या वृत्ताने शहरात एकच खळबळ माजली आहे.
नागपूर येथील कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दी परिसरातील रेल्वे रूळालगत कोळशाच्या ढिगाऱ्यात संतोष गोमकर यांचा मृतदेह आढळून आल्याने वणी शहारत विविध चर्चेला उधाण आले आहे. संतोष गोमकर हा वणी येथील जुना कॉटन मार्केट परिसरातील वास्तव्य असणारा तरुण वणी येथील रेल्वे सायडिंग वर खाजगी कंत्राटदार मार्फत लोडिंग सुपरवायझर म्हणून कार्यरत होता. दररोज प्रमाणे दि.८ मार्चला आपल्या ड्युटीवर गुप्तां कोल वॉशरीच्या खाजगी रेल्वे सायडिंग वर गेला होता, त्यादिवशी कोराडी थर्मल पॉवर स्टेशन च्या दोन्ही बाजूला लोडिंग रॅक भरणे सुरू होते. तेव्हापासून तो घरी परतला नाही वा कुणालाही दिसला नाही आणि कुणीही चौकशी केली नाही. मात्र गुरुवारी रात्री नागपूर येथील कोराडी रेल्वेसायडिंग जवळ अज्ञात मृतदेह आढळून आल्याने नागपूर पोलिसांनी तो मृतदेह ताब्यात घेऊन, मृतदेहाची तपासणी केली असता त्याच्या खिशामध्ये एक एटीएम स्लीपवरील असलेल्या नावावरून वणी पोलीस स्टेशनला सदर इसमाची चौकशी करण्या संदर्भात सूचना देण्यात आल्या, वणी पोलिसांनी चौकशी अंती त्यांचे भाऊ प्रशांत गोमकरला माहिती देऊन नागपूरला रवाना केले असता, त्याने त्याच्या भावाची ओळख पठविल्यानंतर मेयो हॉस्पिटलमध्ये त्याचा मृतदेह शवविच्छेदन करून वणीला आणण्यात आला.
वणीतील खाजगी गुप्ता कोल रेल्वे सायडिंग वर मोबाईल व दुचाकी आढळून आली मात्र मृतदेह नागपूर ला पोहोचला कसा? अशी शंका उत्पन्न होत असून, संतोषचा मृत्यू अपघात की घात असावा अशी चर्चा वणी शहरात रंगत आहे.
संतोषचा मृतदेह हा दोन दिवस कुठे होता आणी कोराडीला पोहचला कसा? यामुळे वणीतिल गुप्ता कोल वॉशरीच्या खाजगी रेल्वे सायडिंग वर त्या रात्री काय झाले? हे तपासणे फार गरजेचे आहे. तसेच शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यु कश्यामुळे झाला हे स्पस्ट होणार आहे.
वणी येथील मोक्षधाम येथे संतोष गोमकर यांचे मृतदेहांवर सायंकाळी ६ वाजता अंतीमसंस्कार करण्यात आला आहे.
